बटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं? तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 09:50 AM2020-04-07T09:50:10+5:302020-04-07T10:00:37+5:30

कारण वाढत्या वयात वेगवेगळे आजार झाल्यानंतर लोक बटाटा खाणं सोडून देतात.

Benefits of potato eating good for weight loss and diabetes myb | बटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं? तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर

बटाटा खाल्याने आपण जाड होऊ असं वाटतं? तर 'हे' वाचून सगळे गैरसमज होतील दूर

googlenewsNext

बटाटा सगळ्यांचाच घरी असतो. काहीजणांच्या आहारात रोज बटाट्याचा समावेश असतो. तर अनेकजण वजन वाढण्याच्या भीतीने, पोटात गॅस होण्याच्या भीतीने खाताना विचार करतात. आज आम्ही तुम्हाला बटाटा खाल्याने शरीराला कोणते फायदे होतात याबाबत सांगणार आहोत. कारण वाढत्या वयात वेगवेगळे आजार झाल्यानंतर लोक बटाटा खाणं सोडून देतात.

पोषक घटक

बटाट्यांमध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरसही आढळतं. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात. बटाट्यांमध्ये असणारं व्हिटॅमिन सी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

बटाटा खाल्याने वजन वाढतं? 

बटाटे खाल्ल्यानं व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी स्थूलताही येते, असा समज प्रचलित आहे. पण एका रिसर्चनुसार, योग्य पद्धतीनं बटाटे खाल्ल्यास तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी ते मदत करतात. बटाट्य़ांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यांमुळे योग्य पद्धतीत आणि योग्य प्रमाणात बटाटे खाणं खरं तर तुम्हाला फायदेशीर ठरतात.

मधुमेह

जर तुम्ही बटाटा प्रमाणापेक्षा जास्त असाल तर मात्र तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही बटाटा खाताना त्याचे योग्य प्रमाण ठेवायला हवे. बटाटा खाण्याचे नुकसान कमी आहेत.  बटाटा खायला आवडत असेल तर तळून खाणं टाळा. कारण  अतितेलाचं सेवन केल्याने शरीराचं नुकसान होत असतं. म्हणून भाजीत किंवा उकडून बटाटा खा.  ( हे पण वाचा- CoronaVirus : कोरोनाच्या रुग्णांना 'हे' औषध दिल्यास हृदयरोगाचा असू शकतो धोका, रिसर्चमधून खुलासा)

फॅट फ्री 

जर तुम्ही तळलेला बटाटा खात असाल तर त्यात फॅट्सचं प्रमाण अधिक असतं.  बटाटा खाल्याने तुमच्या शरीरात फॅट्स निर्माण होत नाही. बटाटा हा पिष्टमय पदार्थांमध्ये मोडतो. यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण ज्या मध्ये जास्त असते त्यामध्ये सोडीयमचे प्रमाण कमी असते. बटाटा हा फॅट फ्री असते. त्यामुळे तुम्हाला फार काही काळजी करण्याची गरज नाही. या शिवाय पोट साफ होण्यासाठी, त्वचा चमकदार करण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुमची सतत खाण्याची सवय नियंत्रणात राहते आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहते. (हे पण वाचा-CoronaVirus: भाज्या, धान्य, दूध घेताना काय काळजी घ्याल?)

Web Title: Benefits of potato eating good for weight loss and diabetes myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.