बटाट्याच्या रसाचे हे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 12:47 PM2018-04-30T12:47:28+5:302018-04-30T12:47:28+5:30

बटाट्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जे अनेकांना माहितीच नसतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया बटाट्याच्या रसाचे फायदे....

Benefits Of Potato Juice For Your Skin And Health | बटाट्याच्या रसाचे हे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क

बटाट्याच्या रसाचे हे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क

बटाट्याची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. काहींना बटाटे आवडतात तर काही बटाट्याच्या नावाने नाके मुरडतात. पण या बटाट्याचे आरोग्यदायी फायदे वाचल्यावर तुम्ही कधीही बटाट्याला कधीही नाही म्हणणार नाही. बटाट्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जे अनेकांना माहितीच नसतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया बटाट्याच्या रसाचे फायदे....

1) कच्चा बटाट्याच्या रसात anti-inflammatory म्हणजेच दाहशामक गुणधर्म असतात. त्याचबरोबर कोपर, मान, पाठ, खांदे आणि गुडघ्याच्या दुखण्यावर हा एक परिमाणकारक नैसर्गिक उपाय आहे. तसंच थंडीत होणाऱ्या सांधेदुखीवर आराम मिळतो. 

2) बटाट्याच्या रसात फायबर भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा रस डिटॉक्सफायिंग एजन्ट म्हणून काम करतो. यामुळे किडनी, पित्ताशय व यकृताचे कार्य सुधारते. या रसात कोलेस्ट्रॉल नसतात. याउलट शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर टाकून पेशींना होणारा रक्तप्रवाह सुधारतो.

3) बटाट्याचा रस त्वचेला लावल्याने पिगमेंटेशन कमी होते, त्वचेतील घाण निघून जाते. १०-१५ दिवस बटाट्याचा रस घेतल्याने नक्कीच आराम मिळेल.

4) अपचन किंवा अॅसिडिटी झाल्यास बटाट्याचा रस प्या. १-२ चमचे बटाट्याचा रस पाण्यात मिसळा व नाश्ता आणि दोन वेळेच्या जेवणाआधी घ्या. असे १-२ आठवडे नियमित करा. 

5) कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. २० मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील. तसंच कोंड्याची समस्या ही दूर होईल.

6) डोळ्यांखाली सूज व काळी वर्तुळे असल्यास ताज्या बनवलेल्या बटाट्याच्या रसात कापसाचा बोळा ओला करून डोळ्यांभोवती लावा. असे रोज केल्यास सूज व काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होईल.
 

Web Title: Benefits Of Potato Juice For Your Skin And Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.