मनुक्याचं पाणी, 'या' गंभीर रोगांवर रामबाण इलाज, काहीच क्षणांत आजार होतील कायमस्वरुपी दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 01:04 PM2021-10-03T13:04:21+5:302021-10-03T20:25:01+5:30
मनुक्याचे पाणी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत.
मनुके खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मुनके (raisin) मुख्यतः मिठाई बनवण्यासाठी वापरले जाते. मनुके खूप चवदार असतात. चवीव्यतिरिक्त हे ड्राय फ्रूट तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. मनुक्याचे पाणी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत.
तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यापासून तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मनुक्याच्या पाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. मनुका पाणी आरोग्याच्या अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. यकृताशी संबंधित समस्यांच्या उपचारासाठी हे फायदेशीर आहे. आपण घरी मनुका पाणी कसे बनवू शकता आणि ते दररोज पिण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात.
मनुक्याचे पाणी कसे बनवायचे?
२ कप पाणी आणि १५० ग्रॅम मनुके घ्या. एका पातेल्यात पाणी घालून उकळी आणा. त्या पाण्यामध्ये मनुके घाला आणि रात्रभर भिजू द्या. सकाळी हे पाणी गाळून मंद आचेवर गरम करा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. त्याचे नियमित सेवन करा.
यकृतासाठी फायदेशीर
मनुक्याचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातून सर्व हानिकारक विष बाहेर काढण्यास मदत होते. हे रक्त शुद्ध करण्यात मदत करते. हे आपले यकृत सहजपणे डिटॉक्स करते.
अॅसिडीटीचा त्रास दुर करते
जर तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर मनुक्याचे पाणी पिणे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. हे पाणी तुमच्या पोटातील आम्ल नियंत्रित करते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
मनुक्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मनुक्याचे पाणी तुमच्या आहाराचा समाविष्ट करू शकतात.
हृदयाचे आरोग्य राखते
मनुक्याचे पाणी तुमचे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे तुमच्या शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
कर्करोग प्रतिबंधित करते
मनुक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.