लाल कांद्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 06:02 PM2018-09-27T18:02:07+5:302018-09-27T18:02:23+5:30
आपण सारेच जाणतो की, कांद्याशिवाय जेवणाला चव येत नाही. काही लोकांना तर जेवणासोबत कच्चा कांदा लागतोच. सलाडमध्ये कांदा नसेल तर त्याला चव येत नाही.
आपण सारेच जाणतो की, कांद्याशिवाय जेवणाला चव येत नाही. काही लोकांना तर जेवणासोबत कच्चा कांदा लागतोच. सलाडमध्ये कांदा नसेल तर त्याला चव येत नाही. कांद्याचा वापर फक्त भाजीची चव वाढविण्यासाठी किवा मसाला आणि सलाडमध्येच नाही तर आजारांपासूनही बचाव करतो.
कांद्याचा रस केसांना लवल्यास केस गळती थांबते. कांद्याच्या रसामुळे केस काळे होण्यासही मदत होते. परंतु, कोणता कांदा फायदेशीर ठरतो याबाबत लोकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारण बाजारामध्ये अनेक प्रकारचे कांदे उपलब्ध असतात.
काही कांद्यामध्ये हिरवी पानंदेखील आढळून येतात. त्याचबरोबर काही कांद्यांमध्ये गाठ आढळून येते. काही कांदे पांढऱ्या रंगाचे असतात. तर काही कांदे गडद लाल रंगाचे असतात
लाल रंगाचा कांदा
लाल रंगाच्या कांद्यामध्ये ते सर्व गुणधर्म आढळून येतात. जे इतर कांद्यांमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर काही अतिरिक्त गुणधर्म या रंगाच्या कांद्यामध्ये आढळून येतात. म्हणजेच लाल कांद्यामध्ये हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुणधर्म आढळून येतात.
लाल कंदा नियमितपणे खाल्याने हृदयाचे आजार होत नाही. लाल कांदा खाल्याने प्रोटस्ट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढविण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो. याला नियमितपणे खाल्याने हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
लाल कांदा केसाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरतो. जर केस गळण्याच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर ज्या भागातील केस जास्त गळत असतील त्या ठिकाणी कांद्याचा रस दिवसातून दोन वेळा लावा. काही दिवसांतच केस गळणं कमी होईल. त्याचबरोबर कांद्याचा लेप लावल्याने केस पांढरे होणार नाहीत. कारण यामध्ये अॅन्टीफंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात.
कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुमधर्म आढळून येतात. त्यामुळे अनेक आजारांपासून बचावासाठी कांद्याचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो.
100 ग्रॅम कच्च्या लाल कांद्यामध्ये जवळपास 37 कॅलरीज असतात. तसेच तेवढ्याच प्रमाणातील पांढऱ्या कांद्यामध्ये 42 कॅलरी असतात. तसं पाहायला गेलं तर पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांद्यामध्ये जास्त कॅलरी आढळून येतात. कांद्यामध्ये फायबरही असतं.
100 ग्रॅम लाल कांद्यामध्ये 12 ग्रॅम फायबर असतं तेच पांढऱ्या कांद्यामध्ये 10 ग्रॅम फायबर असतं. कांद्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळून येतं. जर मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी असणारे आंबट पदार्थ तुम्ही खाऊ शकत नसाल तर त्याऐवजी कांद्याचे सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कांदा लाल असो किंवा पांढरा तो आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. तुम्ही कांदा खाणं टाळत असाल तर कांदा खाणं लगेच सुरू करा.