चंदनाचे 'हे' आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 05:52 PM2018-07-14T17:52:45+5:302018-07-14T17:53:53+5:30
चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे असून आयुर्वेदातही त्याला फार महत्त्व आहे.
चंदन हे अत्यंत पवित्र मानले जात असल्याने पूजेसाठी ते वापरले जाते हे आपणा सर्वांना माहीत आहेच. मात्र चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे असून आयुर्वेदातही त्याला फार महत्त्व आहे. चंदन फक्त थंडावाच देत नाही तर कोरड्या त्वचेसाठी चंदन वरदान आहे. चंदनाचा वापर हा वेगवेगळ्या साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्ती तयार करण्यासाठी केला जातो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात उपलब्ध असतं. चंदनाचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेऊया.
- त्वचा मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी चंदन अत्यंत गुणकारी आहे. चेहऱ्यावर मुरुमे जास्त असल्यास गुलाबपाण्यात चंदन मिश्रित करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. त्यामुळे मुरुमांचा त्रास दूर होतो.
- डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर चंदनाचा लेप डोळ्यांच्या खाली लावल्यास काळे डाग दूर होतात.
- चंदनाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. शरिरातील स्नायू दूखत असल्यास चंदनाच्या तेलाने मालिश केल्यास त्याचा फायदा होतो.
- चंदन पावडर पाण्यात मिश्रित करून आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते.
- शरिराला खाज येत असल्यास अथवा त्वचेसंबंधित एखादी तक्रार असल्यास चंदन अत्यंत गुणकारी ठरते.
- तणाव दूर करण्यासाठी सुद्धा चंदनाचा उपयोग केला जातो.
- चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावल्याने शरीराला थंडावा मिळतो.
- भाजलेल्या ठिकाणी किंवा चटका लागला असेल तर चंदन तुपात मिसळून लावल्याने शरीराचा दाह कमी होण्यास मदत होते.