खाली जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला होतात 'हे' फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:10 AM2018-09-14T11:10:47+5:302018-09-14T11:11:24+5:30

जमिनीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. याने शरीराला आराम तर मिळतोच सोबतच तुमच्या अनेक समस्याही दूर होतात.

The benefits of sleeping on the floor | खाली जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला होतात 'हे' फायदे!

खाली जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला होतात 'हे' फायदे!

googlenewsNext

(Image Credit : www.vitamonk.com)

गणेश चतुर्थी असो वा नवरात्री तसेच दिवाळी, काही लोक या उत्सवांमध्ये जमिनीवर झोपतात. यामागे काही धार्मिक भावना असल्यातरी जमिनीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. याने शरीराला आराम तर मिळतोच सोबतच तुमच्या अनेक समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ जमिनीवर झोपण्याचे फायदे...

बॉडी पोश्चर चांगलं होतं

जमिनीवर झोपल्याने तुमच्या स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. तसेच हाडेही नैसर्गिक स्थितीमध्ये असतात. बेडवर किंवा मुलायम गादीवर झोपल्याने तुम्हाला चांगलं तर वाटतं पण त्याने बॉडी पोश्चर बिघडू शकतो. पण जमिनीवर एका चादरीवर झोपल्याने बॉडी पोश्चर चांगला राहतो.

हाडांच्या संरचेनत सुधारणा होते

जमिनीवर झोपल्याने वाकडी-तिकडी झालेली हाडे नैसर्गिक स्थिती येतात आणि त्यांच्या संरचनेत सुधारणा होते. ही प्रक्रिया फार हळू गतीने होते पण भविष्यात याचे अनेक फायदे बघायला मिळू शकतात. खाली जमिनीवर झोपल्याने हाडांच्या जॉइंट्समध्ये काही इजा झाली असेल तर ती सुद्धा याने बरी होऊ शकते.

पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या दूर होते

जमिनीवर झोपल्याने तुमचा स्पाइन म्हणजेच पाठीचा कणा सरळ होतो आणि त्यावर दबाव सुद्धा कमी पडतो. इतकेच नाही तर असे केल्याने तुम्हाला पाठीच्या कण्यासंबंधी समस्याही होणार नाहीत. पाठीचा कणा हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कारण तो शरीराच्या पूर्ण नर्व सिस्टीमला कंट्रोल करतो आणि याचा थेट संपर्क हा मेंदुशी असतो. 

पाठदुखीपासून मिळतो आराम

खाली जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ एका रेषेत राहित असल्याने शरीरात रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. आणि हळूहळू पाठदुखीच्या त्रासातून सुटका मिळते. चुकीच्या पद्धतीने झोपल्यास किंवा जाड गादीवर झोपल्याने अनेकांना पाठदुखीचा त्रास होत असतो. अशात खाली जमिनीवर झोपल्याने ही समस्या होणार नाही.

हिप्स आणि खांद्यासाठी फायदेशीर

जमिनीवर झोपल्याने हिप्स आणि खांद्यांचं अलायमेंट चांगलं होतं आणि शरीरातील अनेकप्रकारचं दुखणं दूर होतं. जर तुमच्या खांद्यामध्ये, मानेमध्ये सतत वेदना होत असतील तर जाड गादीवर झोपण्यापेक्षा खाली जमिनीवर झोपणे सुरु करा. काही दिवसातच याचा तुम्हाला फायदा दिसेल. 
 

Web Title: The benefits of sleeping on the floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.