तुम्ही सुध्दा सकाळी उठल्यावर याच चुका करता? जाणून घ्या सकाळी उठल्यानंतर आधी काय करायचं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 07:04 PM2019-11-29T19:04:35+5:302019-11-29T19:22:29+5:30

सकाळी लवकर उठणारे खुप कमी लोकं असतात

Benefits of waking up early in morning | तुम्ही सुध्दा सकाळी उठल्यावर याच चुका करता? जाणून घ्या सकाळी उठल्यानंतर आधी काय करायचं

तुम्ही सुध्दा सकाळी उठल्यावर याच चुका करता? जाणून घ्या सकाळी उठल्यानंतर आधी काय करायचं

Next

सकाळी लवकर उठणारे खुप कमी लोकं असतात. आणि त्यातही गजर न लावता उठणारी फारच कमी असतात. आज तुम्हाला अश्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या चुका केल्याने लोकांचा अख्खा दिवस खराब जातो. तुम्हाला जर दिवसाची चांगली सुरूवात करून पुढील  दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर हे नक्की वाचा.

(Image credit- USA today)

सकाळी गजर बंद करुन परत झोपणे ही खूप वाईट सवय आहे. त्यामुळे लवकर उठल्यानंतर परत झोपू नये. सकाळी उठल्यावनंतर ताजेतवाने वाटण्यासाठी गजर एकदा वाजल्यानंतर उठा. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमची कामं वेळत पूर्ण होतात. काम वेळेत झाल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आणि सकारात्मक विचार गरजेचे असतात. त्यामुळे ज्यांच्याकडे ते असतात ती माणसं जीवनात यशस्वी होतात. वेळेचा सदूपयोग करण्यासाठी सकाळी लवकर उठणे फायदेशीर ठरते.

(Image credit- freepik)

रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी व्यायाम करावा. जर दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्याला राग आला तर दिवसभर स्वभात चिडचिड राहते. रागामध्ये व्यक्ती चांगल्या-वाईट गोष्टींमधील फरक समजू शकत नाही.कधीकधी तोंडातून असे शब्द बाहेर पडतात. ज्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. यामुळे रागावर नियंत्रण  ठेवावे. 

(Image credit- shes mazing)

सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईलचा वापर करणं टाळा. कारण आजकाल सगळे उठल्यानंतर सोशल मिडीयावर बराच वेळ वाया घालवतात. यामुळे अनेकदा दिवस खराब जाऊ शकतो. सकाळी उशीरा उठल्यामुळे दिवस कंटाळावाणा आणि निरुत्साही जातो. दिवसभर चिडचिड होते. तसेच कामाचा ताण आणि टेंशन येतं. आणि व्यायामासाठी वेळ काढणे कठीण जातं.


सकाळी उठल्यानंतर नाष्ता करताना पौष्टीक आहार घ्या. मैदायुक्त पदार्थ टाळा. अशा पदार्थांच सेवन केल्यास तुमचे पोट भरेल पण जास्त वेळ उर्जा राहणार नाही. आणि  काही वेळानंतर झोप यायला सुरूवात होईल. म्हणून शरीरासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सकाळी सकाळी गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास महागात पडू शकतं. आणि  शरीराचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे योग्य आहार घ्या. आणि शरीर उत्साही ठेवा.

Web Title: Benefits of waking up early in morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.