उलटे चालण्याचेही असतात बरेच फायदे, फायदे तुमच्या कल्पनेपलीकडचे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 03:37 PM2021-07-30T15:37:16+5:302021-07-30T15:55:29+5:30
चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम असा व्यायाम कधीही व कोठेही करता येतो. दररोज काही मिनिटे चालणे शरीर व आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र काहीवेळा या व्यायामामध्ये बदल करणे देखील फायदेशीर ठरते. उलटे चालण्याचे (walking backwards)देखील शरीराला अधिक फायदे होतात.
चालणे (walking) हा शरीरासाठी सर्वोत्तम असा व्यायाम कधीही व कोठेही करता येतो. दररोज काही मिनिटे चालणे शरीर व आरोग्यासाठी (health) चांगले आहे. मात्र काहीवेळा या व्यायामामध्ये बदल करणे देखील फायदेशीर ठरते. उलटे चालण्याचे देखील शरीराला (benefits of walking backwards) अधिक फायदे होतात. स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार उलटे चालणे आणि धावणे हा चांगला कार्डिओ आहे. याचा वजन कमी करण्यासाठी देखील फायदा होतो. असेच काही उलटे चालण्याचे फायदे जाणून घेऊया.
पायांची ताकद वाढते
सर्वसाधारणपणे आपण सरळ चालतो, त्यावेळी पायांच्या पुढील स्नायूंवर परिणाम होता. मात्र मागील स्नायूंवर याचा परिणाम होत नाही. मात्र जेव्हा तुम्ही उलटे चालता, त्यावेळी या स्नायूंची देखील हालचाल होते व पाय अधिक मजबूत होतात.
शरीराच्या तोल सावरण्यात सुधारणा
उलटे चालत असताना आपण नेहमी पेक्षा वेगळी क्रिया करत असतो, त्यामुळे अशा स्थितीत शरीराचा समन्वय साधत तोल सांभाळणे गरजेचे असते. यामुळे तुमचा मेंदू विशिष्टरित्या तुम्हाला सुचना देतो आणि त्याचा फायदा शरीराचा तोल सांभाळण्यात होतो.
गुडघ्यांवर कमी ताण येतो
एमसी मस्क्यूलोस्केलेटल डिसऑर्डर जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, ज्या लोकांच्या गुडघ्यात वेदना होतात, अथवा दुखापत झालेली असते अशी लोक उलटे चालू शकतात. ज्यामुळे गुडघ्यांवर अधिक ताण पडत नाही.
पाठदुखीची समस्या होत नाही
हॅमस्ट्रिंग्सची समस्या तुमच्या पाठदुखीचे कारण ठरू शकते. हे टाळण्यासाठी दररोज १५ मिनिटे उलटे चालणे फायदेशीर ठरते. यासोबतच आणखी एक फायदा म्हणजे वजन कमी होण्यास देखील यामुळे मदत होते.
उलटे चालताना ही काळजी घ्या
ट्रेडमिलवर उलटे चालत असाल तर वेग कमी ठेवा, अन्यथा तुम्ही घसरून पडू शकता. घरात उलटे चालत असाल तर आजुबाजूला फर्निचर अथवा इतर वस्तू नसतील याची काळजी घ्या. पायाच्या टाचा सुरक्षित ठेवण्यासाठी बुट घाला. बाहेर उलटे चालत असाल तर प्राणी, व्यक्ती, खड्डे या गोष्टींची काळजी घ्या.