रोज अनवाणी चालून तर पाहा रहाल इतके फीट की 'हे' गंभीर आजार जवळपास फिरकणारही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:43 PM2021-08-16T18:43:34+5:302021-08-16T18:45:01+5:30

आरोग्याच्या दृष्टीने अनवाणी चालण्याचे बरेच फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामुळे केवळ दृष्टीच सुधारत नाही, तर तणाव देखील कमी होतो.

benefits of walking barefoot | रोज अनवाणी चालून तर पाहा रहाल इतके फीट की 'हे' गंभीर आजार जवळपास फिरकणारही नाहीत

रोज अनवाणी चालून तर पाहा रहाल इतके फीट की 'हे' गंभीर आजार जवळपास फिरकणारही नाहीत

googlenewsNext

आरोग्याच्या दृष्टीने अनवाणी चालण्याचे बरेच फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामुळे केवळ दृष्टीच सुधारत नाही, तर तणाव देखील कमी होतो. चला तर, जाणून घेऊया सकाळी अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे…

डोळ्यांची दृष्टी सुधारते.
जेव्हा सकाळी सकाळी आपण गवतावर अनवाणी पायांनी चालतो, तेव्हा आम्ही आपल्या शरीराच्या संपूर्ण दबाव पायाच्या बोटांवर पडतो. पायाच्या बोटांवर प्रेशर पडल्याने, डोळ्यांची दृष्टी सुधारते. याशिवाय हिरवेगार गवत पाहून डोळ्यांना आराम देखील मिळतो.

पायांचा व्यायाम होतो.
सकाळी अनवाणी पायांनी फिरणे म्हणजे पायांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे पाय आणि गुडघे यांचे स्नायू मोकळे होतात आणि पायांना आराम मिळतो.

तणावातून मुक्तता मिळते
सकाळी अनवाणी पायांने चालण्याने मनाला देखील विश्रांती मिळते. सकाळची ताजी हवा, सूर्यप्रकाश, हिरवळ आपल्या दृष्टीला आणि मनाला ताजेतवाने करते. या वातावरणात फिरण्याने आपल्याला बर्‍याच आरामदायी वाटते आणि व्यक्ती डिप्रेशनपासून देखील दूर राहते.

मधुमेह रुग्णांसाठी लाभदायी
मधुमेहासाठी हिरव्यागार गवतामध्ये बसणे, जॉगिंग करणे आणि त्याकडे पाहणे देखील फार चांगले मानले जाते. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये कोणतीही जखम सहजपणे बरी होत नाही. परंतु, जर मधुमेह रूग्ण हिरव्यागार गवतावर अनवाणी चालत असेल आणि नियमितपणे स्वच्छ वातावरणात श्वास घेत असेल, तर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक प्रमाणात होतो आणि या समस्येवर सहज मात करता येते.

हाडे मजबूत होतात
आजकाल ठिसूळ सांध्यांमुळे अनेक विकार वाढतात. याचे प्रमुख कारण सुर्यप्रकाशाचा प्रभाव आहे. त्यामुळे सकाळी मोकळ्या हवेत अनवाणी चालल्याने आपोआपच शरीराला आवश्यक  व्हिटामिन डी मिळते. यामुळे हाडाचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते. गर्भवती स्त्रियांसाठी हे व्हिटामिन फारच आवश्यक आहे.

उच्च रक्तदाबाच्या समस्येवर फायदा
आपल्याला ज्याप्रमाणे हवा आणि पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे जमिनीशी किंवा मातीशी थेट संपर्क होणे ही देखील आपल्या शरीराची मूलभूत गरज असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना अनवाणी चालण्याचा सल्ला दिला जातो

Web Title: benefits of walking barefoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.