डायटिंग, व्यायाम करुनही वजन वाढतंय? खाणं सुरू करा लाल बटाटा; वजन लगेच होईल कमी... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 05:50 PM2023-12-22T17:50:30+5:302023-12-22T17:52:07+5:30

ज्याप्रमाणे पिवळा बटाटा खाणे फायदेशीर ठरतो, त्याचप्रमाणे लाल बटाटा खाणे देखील शरारीसाठी लाभदायक मानला जातो.

Benifits of eating red potato help to control high blood presure also reducing weight | डायटिंग, व्यायाम करुनही वजन वाढतंय? खाणं सुरू करा लाल बटाटा; वजन लगेच होईल कमी... 

डायटिंग, व्यायाम करुनही वजन वाढतंय? खाणं सुरू करा लाल बटाटा; वजन लगेच होईल कमी... 

Benefits of eating red potato: लाल बटाट्याचा वापर भाजून खाण्यासाठी, सुपमध्ये किंवा सलाडमध्ये केला जातो.पौष्टिकतेने परिपूर्ण असलेला लाल बटाटा निरोगी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे याचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केला तर त्याचे आपल्या शरिरासाठी फायदे दिसून येतात.

वजन कमी करण्यासाठी  फायदेशीर :

लाल बटाट्यामध्ये पोटॅशिअम, कार्बोहाड्रेट,प्रोटीन, फायबर, लोह, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशिअमसारखे तत्व मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट कायम भरलेलं राहचं, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे आपोआप वजन कमी होते.

ब्लड प्रेशर कंट्रोल :

पोट्रॅशिअमचा उत्तम सोर्स म्हणजे लाल बटाटा होय. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी लाल बटाटा आवर्जून खाणे गरजेचे आहे. 

आहारतज्ञांच्या माहितीनुसार, लाल बटाट्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन 6 मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे मानले जाते. वारंवार तणाव, थकवा जाणवल्यास आहारात लाल बटाट्याचा समावेश करावा.

रोगप्रतिकारशक्ती वाढते :

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी लाल व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते. लाल बटाटा विटामीन सी मुख्य सोर्स आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढून सर्दी,खोकला झपाट्यास दूर होतो.

Web Title: Benifits of eating red potato help to control high blood presure also reducing weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.