आता विजेचा झटका लागणंही तुम्हाला आवडेल, कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 10:43 AM2019-06-24T10:43:59+5:302019-06-24T10:46:45+5:30
अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, विजेचा झटका लागल्यावर माणसाची काय अवस्था होते. केस उभे राहतात, शरीर काळं पडलं, नाका-तोंडातून धूर निघतो आणि नंतर ती व्यक्ती जरा वेडसर वागायला लागते.
(Image Credit : JustScience)
अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, विजेचा झटका लागल्यावर माणसाची काय अवस्था होते. केस उभे राहतात, शरीर काळं पडलं, नाका-तोंडातून धूर निघतो आणि नंतर ती व्यक्ती जरा वेडसर वागायला लागते. सामान्यपणे विजेचा झटका लागल्यावर अशीच स्थिती होते, असं सर्वांना माहीत आहे. त्यासोबतच मानसिक रुग्णांना सुद्धा उपचारासाठी विजेचे झटके दिले जातात असं अनेकांना माहीत आहे. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.
विजेच्या झटक्याने म्हणजेच शॉकने मेंदूच्या क्रिएटिव्हिटीमध्ये सुधार केला जाऊ शकतो. जर्मनीमध्ये फ्रीबर्ग युनिव्हर्सिटीच्या अभ्यासिका एलिझाबेथ हर्नस्टीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रान्सक्रेनिअल डायरेक्ट करन्ट स्टिम्यूलेशन(टिडिसीएस) टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असं करून दाखवलं आहे. डायरेक्ट करन्ट स्टिम्यूलेशनमध्ये डोक्याला इलेक्ट्रोड लावून विजेचे हलके झटके दिले जातात.
न्यूरोसायंटिस्ट असा विचार करतात की, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड करन्टमुळे मेंदूच्या पेशी अधिक मेहनत करतात. जेव्हा निगेटिव्ह इलेक्ट्रोडचा उलटा प्रभाव पडतो. ब्रेन स्टिम्यूलेशनमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी लिहिले की, '२२ मिनिटे टिडीसीएसनंतर युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी तीन स्टॅंडर्ड टेस्टमध्ये चांगले परिणाम दाखवले. मानसोपचारतज्ज्ञ क्रिएटीव्हिटी मोजण्यासाठी या टेस्टचा उपयोग करतात.
जेव्हा एनोड मेंदूच्या उजव्या भागाच्या वर इनपीरिअर फ्रंटल जाइरसमध्ये लावण्यात आला तेव्हा विद्यार्थ्यांनी चांगलं प्रदर्शन केलं. मेंदूचा हा भाग अडचणी, समस्या सोडवणे आणि तात्कालिक प्रतिक्रिया देणे यासंबंधित आहे. आयएफजी डाव्या बाजूने कॅथोड फिट केलं गेलं. मेंदूच्या उजव्या भागाची क्रिया वाढवण्यासाठी आणि डाव्या बाजूची क्रिया कमी करण्याचा प्रयत्न केला गेला.