जेवण केल्यावर आता फुगणार नाही पोट, गॅसही दूर करतील हे 5 घरगुती उपाय; एकदा कराच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:42 AM2023-03-30T10:42:43+5:302023-03-30T10:43:07+5:30

Bloating Home Remedies: असं मानलं जातं की, घाईघाईने जेवणं करणं आणि यावेळी पोटात जास्त हवा जाते. सोबतच जास्त खाणे, बद्धकोष्ठता, लिव्हरचा आजार, गर्भावस्था यामुळे ब्लोटिंगची समस्या होते.

Best and effective home remedies to treat bloating gas and constipation | जेवण केल्यावर आता फुगणार नाही पोट, गॅसही दूर करतील हे 5 घरगुती उपाय; एकदा कराच

जेवण केल्यावर आता फुगणार नाही पोट, गॅसही दूर करतील हे 5 घरगुती उपाय; एकदा कराच

googlenewsNext

Bloating Home Remedies: बरेच लोक जेवण झाल्यानंतर पोट फुगण्याची तक्रार करतात. अनेकदा तर थोडं खाल्ल्यानंतरही पोट खूप फुगतं. मेडिकल भाषेत याला ब्लोटिंग असं म्हणतात. यालाच पोटात गॅस किंवा हवा भरणे असंही म्हणतात. पोटात सूज किंवा वेदनेसोबत ढेकर किंवा पोटात अस्वस्थता ही ब्लोटिंगची लक्षण आहेत.

असं मानलं जातं की, घाईघाईने जेवणं करणं आणि यावेळी पोटात जास्त हवा जाते. सोबतच जास्त खाणे, बद्धकोष्ठता, लिव्हरचा आजार, गर्भावस्था यामुळे ब्लोटिंगची समस्या होते. त्याशिवाय बीन्स, डाळी, ब्रोकोली, कोबी, जास्त मीठ असलेले पदार्थ आणि दुधामुळेही ही समस्या होऊ शकते.

न्यूट्रिशनिस्ट आणि डाइटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, पोटातील सूज रोखण्याचे किंवा कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. ज्यात काही मसाले आणि जडीबुटींचा समावेश आहे. जे पचनाला मदत करतात आणि आतड्यांचं काम चांगलं करून पोटातील गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात.

आलं आणि पुदीन्याचा चहा

आलं अपचन, मळमळ आणि सूज कमी करण्यासोबतच अनेक पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी चांगला उपाय आहे. आल्यामध्ये कार्मिनेटिव असतं, जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये गॅस कमी करतं. तुम्ही आल्याचा चहा बनवून पिऊ शकता आणि यात पुदीन्याची पानं टाकायला विसरू नका. तुम्ही आलं अशा गोष्टींमध्ये टाकू शकता ज्याने गॅस तयार होतो, जसे की, डाळी, छोले, राजमा इत्यादी.

बडीशेपचं पाणी

जेवण केल्यावर बडीशेप खाल्ल्याने पचन प्रक्रिया चांगली होते. याने पोटातील गॅस आणि सूजही कमी होते. दुसरा उपाय हा आहे की, बडीशेप, थोडं आलं आणि एक चिमुट हींग व चिमुटभर काळं मीठ टाकून चहा करा. तिसरा उपाय आहे की, पाण्यात बडीशेप, जिरं आणि धणे मिक्स करून पाणी गरम करून पिऊ शकता.

ओवा आणि पुदीन्याचं पाणी

एका भांड्यात तुम्ही पाणी, ओवा आणि सैंधव मीठ टाकून पाणी उकडून घ्या. हे पाणी कोमट करून जेवण झाल्यावर प्याल तर पोट फुगणं किंवा गॅसची समस्या होणार नाही. त्याशिवा दिवसभर थोडं थोडं पुदीन्याचं पाणी प्या.

हींग आणि जिऱ्याचा तडका

डाळ, राजमा, छोले बनवताना आलं, ओवा, हींग, धणे, बडीशेप आणि जिरंसारख्या मसाल्यांचा तडका द्यावा. याने टेस्ट तर चांगली होईलच सोबतच पोट फुगण्याची आणि गॅसची समस्याही होणार नाही.

ही फळंही फायदेशीर

जेवण झाल्यानंतर तुम्ही केळी, पपई, जांभळं, गाजर, संत्री आणि अननससारखे फळं खाऊ शकता. यात भरपूर फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन्स असतात. जे पचनाला मदत करतात आणि आतड्यांचं आरोग्यही चांगलं ठेवतात.

Web Title: Best and effective home remedies to treat bloating gas and constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.