हार्ट अटॅकला जबाबदार कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा बेस्ट उपाय, लगेच सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 08:29 PM2023-09-06T20:29:07+5:302023-09-06T20:30:04+5:30

गुड कोलेस्ट्रॉलची गरज शरीरात नवीन सेल्स तयार करण्यासाठी आणि हार्मोन्स मॅनेजमेंटसाठी असते. पण जर याचं प्रमाण वाढलं तर मग अडचण होऊ लागते.

Best Exercise to reduce bad cholesterol from body | हार्ट अटॅकला जबाबदार कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा बेस्ट उपाय, लगेच सुरू करा!

हार्ट अटॅकला जबाबदार कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा बेस्ट उपाय, लगेच सुरू करा!

googlenewsNext

बदलत्या लाइफस्टाईलमुळे कमी वयातही हृदयासंबंधी आजार होऊ लागले आहेत. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हृदयरोगांचा धोका कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे वाढतो. अशात कोलेस्ट्रॉलबाबतची माहिती सर्वांनाच असली पाहिजे. त्याच आज जाणून घेऊ...

कोलेस्ट्रॉल केवळ घातक असतं असं नाही ते आपल्या शरीरासाठी गरजेचंही असतं. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत एक बॅड कोलेस्ट्रॉल आणि दुसरं बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉलची गरज शरीरात नवीन सेल्स तयार करण्यासाठी आणि हार्मोन्स मॅनेजमेंटसाठी असते. पण जर याचं प्रमाण वाढलं तर मग अडचण होऊ लागते.

कधी वाढते समस्या?

कोलेस्ट्रॉल वाढण्याचा त्रास कधी होऊ लागतो असा प्रश्न अनेकदा पडतो. तर आपण जेव्हा एखादं असं काम करतो जे आपलं शरीर सहजपणे स्वीकारत नाही. यात फार जास्त प्रमाणात फास्ट फूडचं सेवन, सोबतच ओव्हर इटिंगचाही समावेश आहे. याने लिव्हरवर वाईट प्रभाव पडतो.

कसं वाढतं याचं प्रमाण?

जेव्हाही आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉलची गरज असते, तेव्हा छोट्या आतड्यांकडून शोषलं गेलेलं कोलेस्ट्रॉल शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी लिव्हर काढून घेतं. आणि त्याचा वापर करू लागतात. पण फार जास्त काही खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक होऊन शरीरात हार्मफुल कोलेस्ट्रॉल वाढू लागतं, ज्याला मेडिकलच्या भाषेत एलडीएल असं म्हणतात. एलडीएल ब्लड सर्कुलेशनला असं बाधित करतं की, हार्ट आणि ब्रेनवर प्रभाव पडू लागतो. ज्याने जीवाला धोका होऊ शकतो.

दिसत नाही कोणती लक्षण

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरात वाढलं याची माहिती अचानक एखाद्या आजाराच्या रूपाने मिळते. कारण हाय कोलेस्ट्रॉलची काही सिस्टीम नसते की, त्यांना ओळखलं जातं. केवळ ब्लड टेस्टच्या माध्यमातून हे कळू शकतं. त्यामुळे वयाच्या २५ वर्षापासून दरवर्षी एकदा पूर्ण बॉडी चेकअफ किंवा ब्लड टेस्ट नक्की कराव्यात.

बेस्ट उपाय

वाढत्या वयासोबत हृदय आणि मेंदूसंबंधी आजारांचा धोका वाढू नये यासाठी गरजेचं की, तुम्ही तुमच्या आवडीची प्रत्येक गोष्ट खावी, पण कंट्रोलमध्ये खावी. सोबतच नियमित एक्सरसाइजसाठी वेळ काढणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जास्त फास्ट फूड खाऊ नका, तेलकट पदार्थ जास्त खाऊ नका.

Web Title: Best Exercise to reduce bad cholesterol from body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.