'या' सुपरफुड्समुळे मेंदु होईल इतका तल्लख की कोणतीही समस्या चुटकीसरशी सोडवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 01:07 PM2021-10-11T13:07:58+5:302021-10-11T15:16:16+5:30
आम्ही तुम्हाला असे काही खाद्यपदार्थ सांगणार आहोत जे खाल्ल्यावर तुमची स्मरणशक्ती कैकपटीने वाढेल. तसेच तुमच्या मेंदुचे कार्यही अधिक उत्तमरित्या चालेल. त्याचा प्रभाव तुम्हाला काही दिवसांत जाणवू लागेल.
मेंदु कार्यक्षम राहण्यासाठी उत्तम आहार आवश्यक असतो. आम्ही तुम्हाला असे काही खाद्यपदार्थ सांगणार आहोत जे खाल्ल्यावर तुमची स्मरणशक्ती कैकपटीने वाढेल. तसेच तुमच्या मेंदुचे कार्यही अधिक उत्तमरित्या चालेल. त्याचा प्रभाव तुम्हाला काही दिवसांत जाणवू लागेल.
बदाम
बदाम रात्रीच्या वेळी पाण्यात भिजायला टाका. सकाळी त्यांची साल काढुन घ्या. बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा. एक ग्लास दूध गरम करा. त्यात ही पेस्ट टाका. त्यात ३ चमचे मध टाका. दूध जेव्हा कोमट असेल तेव्हा प्या. यानंतर दोन तास काही खाऊ नका.
कॉफी
सकाळी कॉफी घेणारे लोक हे कॉफी न घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत उत्साहाने काम करतात. दुपारीही त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो. कॅफिनमुळे आपण सक्रिय राहतो, मुड फ्रेश राहतो.
अक्रोड
यात अँटीऑक्सिडंट असतात. दिवसभरात सात आक्रोड खाल्ले तर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात. सोबत कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते. स्मरणशक्ती वाढविण्यास मदत होते. २० ग्रॅम अक्रोड आणि १० ग्राम मुनका एकत्र खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
ग्रीन टी
ग्रीन टी मेंदुसाठी लाभदायी आहे. यामुळे मेंदुच्या कोशिकांची निर्मिती, स्मरणशक्तीत सुधारणा, एखादी गोष्ट शिकण्याची क्षमता वाढते.
वेलची
याचे तेल स्मरणशक्ती वाढविण्यासाठी लाभदायी आहे. हे तेल कॅलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे मेंदु गतीने काम करतो. हे तेल डोक्याला थंडावा प्रदान करते. तणावात काम करतानाही डोके शांत राहते.
रोज मेरी ऑईल
नैसर्गिक पद्धतीने स्मरणशक्ती वाढवायची असेल तर रोज मेरी तेलाचा फार फायदा होतो. यात औषधी गुणधर्म असतात. याने मेंदुची ताकद वाढते. त्यामुळेच याला ब्रेन टॉनिक असेही म्हटले जाते. अगदी पुरातन काळापासून याचा वापर केला जातो. तिखट वासामुळे जेवण तयार करण्यातही याचा उपयोग केला जातो. सुगंध चिकित्सेतही याचा वापर केला जातो. याच्या तिखट वासाने मेंदु तल्लख होतो व मेंदुची कार्यक्षमता वाढते.
सफरचंद
यातील पेक्टिन नावाचे फायबर आहे. याने इम्युन सपोर्टिव्ह प्रोटिन्सचा स्तर वाढतो. त्यामुळे दिवसातून एक सफरचंद खायला हवे. त्याने तुम्हाला आजारपण येणार नाही. याने स्मरणशक्तीही वाढते.
हिरव्या भाज्या
ब्रोकोली, पालक, शेपू, मेथी असा हिरव्या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे ई, के आणि बी 9 (फोलेट) समृध्द असते आणि मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी व्हिटॅमिन सी सारख्या फायटोन्यूट्रिएंट्स महत्वाच्या असतो. व्हिटॅमिन के मानसिक सतर्कता वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.