रिकाम्या पोटी खाण्याच्या बेस्ट गोष्टी, आरोग्याला होतात अनेक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 10:15 AM2023-12-04T10:15:04+5:302023-12-04T10:15:23+5:30
आज आम्ही तुम्हाला अशा काही सकाळी सेवन करण्याच्या पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने आरोग्याला फायदे मिळतात.
Healthy Diet: आपल्या दिवसाची सुरूवात आरोग्यदायी गोष्टींनी करण्याचे अनेक फायदे असतात. याने पोट चांगलं राहतं पचनासंबंधी समस्या कमी होतात, मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, वजनही कंट्रोलमध्ये राहतं आणि पोटात चांगले गट बॅक्टेरिया वाढतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही सकाळी सेवन करण्याच्या पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने आरोग्याला फायदे मिळतात. या गोष्टी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता.
पपई
रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असत आणि पोट चांगलं ठेवण्यासोबतच याने इम्यूनिटीही मजबूत राहते. त्याशिवाय पपईमध्ये अॅंटी-ऑक्सिडंटचं प्रमाणही भरपूर असतं. पपई खाल्ल्याने ब्लोटिंगची म्हणजे पोट फुगण्याची समस्याही कमी होते.
भिवजलेले ड्राय फ्रुट्स आणि दाणे
सकाळी रिकाम्या पोटी जर भिजवलेले ड्राय फ्रुट्स जसे की, बदाम, अळशीच्या बिया किंवा चीया सीड्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
केळी
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यानेही शरीराला अनेक फायदे मिळतात. केळीच्या सेवनाने एनर्जी वाढते आणि ब्लड शुगर लेव्हलही रेग्युलेट होते. त्याशिवाय केळी खाल्ल्यावर पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.
बडीशेपचं पाणी
रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट बडीशेपचं पाणी सेवन केल्याने पचनतंत्र चांगलं राहतं. तसेच वजन कमी करण्यासही मदत मिळते. हे पाणी प्यायल्याने अपचन आणि पोटातील गॅसही दूर होतो. बडीशेपचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप टाका आणि पाणी उकडून घ्या. हलकं थंड झाल्यावर ते सेवन करा.