ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे घरगुती उपाय, लगेच मिळवा आराम!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 10:21 AM2018-10-04T10:21:13+5:302018-10-04T10:21:52+5:30
बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि बदलत्या आहाराच्या सवयींमुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. खासकरुन भारतात ब्लड प्रेशरच्या रुग्णांची समस्या वेगाने वाढत आहे.
बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि बदलत्या आहाराच्या सवयींमुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. खासकरुन भारतात ब्लड प्रेशरच्या रुग्णांची समस्या वेगाने वाढत आहे. ब्लड प्रेशरचा आजार तसा तर सामान्य वाटतो, मात्र याला वेळीच कंट्रोल केलं तर यामुळे हृदयरोग, स्ट्रोक या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. ब्लड प्रेशरमध्ये अनेकजण अॅलोपॅथीक औषधांचा वापर करतात, पण याने साइड इफेक्टही असतात. मात्र यावर काही घरगुती उपायही आहेत ज्यांच्या मदतीने ब्लड प्रेशर कमी केलं जाऊ शकतं.
१) मिठाचं कमी प्रमाण
जास्त मिठाचं जास्त सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढते. त्यामुळे आहारातून मीठ कमी प्रमाणात घेतल्यास ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते.
२) पायऱ्यांचा प्रयोग
ऑफिस किंवा घरी लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांचा वापर करा. दररोज व्यायाम केल्याने हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
३) कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण
आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यातून तुम्हाला कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळेल. आहारात सफरचंद, संत्री, कांदा, ब्रोकोली यांचा समावेश करा.
४) ब्राउन राइस
ब्राउन राइसमध्ये मीठ, कोलेस्ट्रॉल आणि चरबी फार कमी प्रमाणात असते. त्यामुळे ब्राउन राइस हाय ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
५) लसूण
लसणामध्ये एलिसीन असतं, जे नायट्रिक ऑक्साइडचं उप्तादन वाढवतं. आणि याने मांसपेशींना आरामही मिळतो. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी रोज लसणाची एक कळी खावी.
६) आवळा
आवळा अनेक आजारांवर रामबाण उपाय मानला जातो. आवळा ब्लड प्रेशरच्या समस्याही दूर करण्यास फायदेशीर आहे. याने ब्लड सर्कुलेशन चांगलं राहतं. आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं.
७) मुळा
मूळा खाल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. मुळा तुम्ही शिरवून किंवा कच्चाही खाऊ शकता. याने शरीराला मिनरल्स आणि पोटॅशिअम मिळतं.
८) वेलची
जाणकारांनुसार, वेलचीच्या नियमीत सेवनाने ब्लड प्रेशर योग्यप्रकारे काम करतं. याने शरीराला अॅंटीऑक्सिडेंट मिळतात. तसेच ब्लड सर्कुलेशनही योग्य राहतं.
९) कांदा
आहारातून कांद्याच्या नियमीत सेवनाने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं. यात क्योरसेटिन आढळतं. हा एक असा ऑक्सिडेंट आहे ज्याने हृदयरोगांचा धोका कमी होतो.
१०) काळे मिरे
जेव्हा ब्लड प्रेशर वाढलेलं असतं तेव्हा अर्धा ग्लास गरम पाण्यात एक चमचा काळ्या मिऱ्याची पावडर टाका. हे पाणी दोन-दोन तासांनी सेवन करा. याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहिल.
११) लिंबू
हाय ब्लड प्रेशर लगेच कंट्रोल करायचा असेल तर अर्धा ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने लगेच फायदा होईल.
१२) तुळस
तुळशीची काही पाने आणि दोन कडूलिंबाची पाने बारीक करुन पाण्यात मिश्रण करुन सेवन करा.
१३) पपई
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी पपई फार फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी पपई खाल्यास अधिक फायदा होतो.
१४) आले
आल्यामध्ये अॅंटीऑक्सिडेंट तत्व असतात जे खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच आल्याने रक्तप्रवाहची चांगला राहतो.
१५) मेथी
ती ग्रॅमी मेथीचं पावडर सकाळी-सायंकाळी पाण्यासोबत सेवन करा. याने फायदा होईल.
टिप - हे उपाय वापरण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. कारण काहींना यातील काही पदार्थांची अॅलर्जी असण्याची शक्यता असू शकते.