दात सैल झालेत किंवा काही खाताना हलतात का? हे घरगुती उपाय कराच, मग बघा कमाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:04 PM2020-01-17T12:04:49+5:302020-01-17T12:10:32+5:30

अनेकदा असं होतं की, अचानक दात कमजोर होतात म्हणजे दात हलतात. वाढत्या वयात किंवा कमी वयात दातांचं हलणं तुम्हाला चिंता देऊ शकतं.

Best home remedies to cure shaking teeth | दात सैल झालेत किंवा काही खाताना हलतात का? हे घरगुती उपाय कराच, मग बघा कमाल!

दात सैल झालेत किंवा काही खाताना हलतात का? हे घरगुती उपाय कराच, मग बघा कमाल!

googlenewsNext

(Image Credit : gablessedationdentistry.com)

अनेकदा असं होतं की, अचानक दात कमजोर होतात म्हणजे दात हलतात. वाढत्या वयात किंवा कमी वयात दातांचं हलणं तुम्हाला चिंता देऊ शकतं. अनेकदा दातांचं हलणं याला हिरड्यांची एखादी समस्या कारणीभूत असू शकते. तसेच पॅरीयोडोंटम नावाच्या एका आजारानेही दात कमजोर होऊन हलतात. अनेकदा दातांच्या आजूबाजूचे टिशू सैल होतात त्यामुळे दात हलू लागतात.

(Image Credit : medicalnewstoday.com)

आता दात हलत आहे म्हटल्यावर अनेकांना काही टणक किंवा कडक पदार्थ खाण्याची भिती असते. कारण अशावेळी दात तुटूही शकतो.  या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत. हे घरगुती उपाय वापरून तुम्ही दातांची ही समस्या दूर करू शकता.

१) मिठासोबत मोहरीचं तेल

मीठ आणि मोहरीचं तेल तुमची दात सैल होण्याची किंवा दात हलण्याची समस्या दूर करू शकतं. यासाठी थोडं मीठ घ्या आणि त्यात मोहरीचं तेल टाका याने दात स्वच्छ करा. मीठ हे आयुर्वेदात तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं आहे. मिठाक अ‍ॅंटी-सेप्टिक गुण असतात. अशात तुम्ही मिठाच्या पाण्याने गुरळा देखील करू शकता. याने हिरड्यांना सूज येण्याची समस्याही दूर होते.

२) काळे मिरे आणि हळद

(Image Credit : everydayhealth.com)

काळे मिरे आणि हळदीचा वापर करून तुम्ही दातांमधील बॅक्टेरियाचा सफाया करू शकता. याने हिरड्याही मजबूत होतात. दोन्ही पदार्थ समान प्रमाणात घ्या. हे दातांवर लावा आणि दातांवर फिरवा. याने तुमची दात हलण्याची समस्याही दूर होईल. 

३) हिरव्या भाज्यांचं सेवन

(Image Credit : fitlife.tv)

तुमच्या आहारात जेवढं शक्य असेल तेवढा हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. हिरव्या भाज्यांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे इम्यून सिस्टीमला मजबूत करतात. हिरव्या भाज्या खाल्ल्याने इन्फेक्शनही होत नाही आणि दातांची मुळं मजबूत होतात. लहान मुलांचीही दातं अनेकदा हलतात, त्यांच्यावरही या उपयांचा वापर तुम्ही करू शकता.

४) अ‍ॅसिड कमी घ्या

अ‍ॅसिडयुक्त पेय किंवा पदार्थांचं सेवन अधिक प्रमाणात केल्याने दात सैल होण्याची समस्या होते. त्यामुळे असे पदार्थ किंवा पेयांचं सेवन बंद करा. यात सॉफ्ट ड्रिंक, सोडा, कोल्डड्रिंक यांचं सेवन बंद करा.

Web Title: Best home remedies to cure shaking teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.