वाढलेल्या डासांच्या संख्येमुळे 'हे' आजार मृत्यूला कारणीभूत, 'या' उपायांनी होईल त्वरित सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:34 PM2021-09-14T15:34:00+5:302021-09-14T16:51:54+5:30

मच्छरांची पैदास रोखण्यासाठी धूरफवारणीसह अनेक उपाययोजना करण्यात येतात. तसेच बाजारातही मच्छरांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीपासून अगरबत्तीपर्यंत अनेक वस्तू उपलब्ध आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय करून मच्छरांच्या समस्येपासून सुटका करता येते.

best home remedies to kill mosquito, use this remedies and kill mosquitos | वाढलेल्या डासांच्या संख्येमुळे 'हे' आजार मृत्यूला कारणीभूत, 'या' उपायांनी होईल त्वरित सुटका

वाढलेल्या डासांच्या संख्येमुळे 'हे' आजार मृत्यूला कारणीभूत, 'या' उपायांनी होईल त्वरित सुटका

Next

पावसाळ्यात मच्छरांची पैदास वाढते. त्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. मच्छरांमुळे डेंग्यु, मलेरिया, झिका व्हायरस, चिकनगुनिया यासारख्या रोगांचा फैलाव होतो. मच्छरांची पैदास रोखण्यासाठी धूरफवारणीसह अनेक उपाययोजना करण्यात येतात. तसेच बाजारातही मच्छरांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीपासून अगरबत्तीपर्यंत अनेक वस्तू उपलब्ध आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय करून मच्छरांच्या समस्येपासून सुटका करता येते.

कापूर: कापूर हा बहुगुणी असून त्याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. तसेच त्याच्या उग्र गंधामुळे वातावरण प्रसन्न राहते. कापराचे काही तुकडे वॉशरुम, किचन आणि कपाटात ठेवल्यास मच्छरांची पैदास होत नाही. तसेच घरातील कोपऱ्यात बाल्कनीत एका बाटलीत कापूर घालून ठेवल्यास अर्ध्या तासास हा कापाराचा सुगंध घरात पसरतो. त्यामुळे मच्छर घराबाहेर पड़तात आणि या समस्येपासून सुटका होते.

लसूण: खाद्यपदार्थांचा स्वाद वाढणावारा पदार्थ म्हणजे लसूण. मच्छरांना पळवण्यासाठी लसनाचा नैसर्गिक स्प्रे म्हणून वापर करता येतो. लसणाच्या काही पाकळ्या पाण्यासोबत उकळून घ्याव्यात. त्यानंतर ते पाणी बाटलीत भरून त्याचा स्प्रेसारखा वापर करता येतो. घरातील कानाकोपऱ्यात पडद्यांवर अशा ठिकाणी मच्छर लपतात. त्याठिकाणी हा स्प्रे शिंपडावा. त्यामुळे मच्छरांच्या समस्येपासून मुक्ती मिळते.

कॉफी: प्रत्येकाच्या घरात कॉफी असतेच. अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीनेच होते. या कॉफीमुळेही मच्छरांच्या समस्येपासून मुक्ती मिळते. साचेलेल्या पाण्यात किंवा दलदलीच्या ठिकाणी मच्छरांची पैदास होते. अशा ठिकाणी चिमूटभर कॉफीची पूड टाकल्यास मच्छरांच्या समस्येपासून सुटका होते.

लव्हेंडर ऑईल: लव्हेंडर ऑईलच्या उग्र सुंगघामुळे मच्छर तग धरू शकत नाहीत. त्यामुळे पडद्यांवर, बेडवर किंवा कपड्यांवर लव्हेंडर ऑईल लावल्यास मच्छरांपासून सुटका तर होतेच. त्याचप्रमाणे या सुंगधाने मनही प्रसन्न राहते. तसेच या तेलाचे कोणतेही साइड इफ्टेक्स नसल्याने हे तेल हातापायांनाही लावू शकतो. लॅव्हेंडर ऑईलप्रमाणे पुदीनाच्या तेलाच्या वापर केल्यासही मच्छरांच्या समस्येपासून मुक्ती मिळते. त्यामुळे मच्छरांना पळवणयासाठी कोणतेही महागडे उपाय करण्याची गरज नसून या घरगुती उपायांनी मच्छरांपासून मुक्ती मिळू शकते.

Web Title: best home remedies to kill mosquito, use this remedies and kill mosquitos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.