वजन कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ भिजवून खा अन् पाहा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 12:31 PM2019-09-06T12:31:02+5:302019-09-06T12:32:20+5:30

जेव्हा एखादा वेट लॉस डाएट प्लान करण्यात येतो. त्यावेळी त्यामध्ये इम्युनिटी वाढविण्यारे खाद्यपदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं. कारण इम्युनिटी म्हणजेच शरीराची रोगप्रतिकार शक्ती जेवढी मजबुत असते,

Best immunity booster food for weight loss | वजन कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ भिजवून खा अन् पाहा कमाल

वजन कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ भिजवून खा अन् पाहा कमाल

googlenewsNext

जेव्हा एखादा वेट लॉस डाएट प्लान करण्यात येतो. त्यावेळी त्यामध्ये इम्युनिटी वाढविण्यारे खाद्यपदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं. कारण इम्युनिटी म्हणजेच शरीराची रोगप्रतिकार शक्ती जेवढी मजबुत असते, तेवढ्याच वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. वेट लॉस डाएट प्लानमध्ये इम्युनिटी बूस्ट करणारे पदार्थ असणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे शरीराला अशक्तपणा जाणवत नाही. त्यामुळे वेट लॉस डाएट प्लानमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याऱ्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. शरीराला सहज पोषक तत्व मिळण्यासाठी काही पदार्थ भिजवून खाणं फायदेशीर ठरतं. आज आम्ही तुम्हाला काही असे पदार्थ सांगणार आहोत. जे भिजवून खाणं गरजेचं असतं. हे पदार्थ भिजवून खाल्याने शरीराला पोषक तत्वांसोबतच वजन कमी करण्यासाठीही मदत होते. 

मेथीचे दाणे

वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे भिजवू ते पाणी पिणं फायदेशीर ठरतं. रात्रभर मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाणी प्या. तसेच भिजवलेले मेथीचे दाणे खाल्याने शरीराची इम्यूनिटी सिस्टिम मजबुत होऊ शकते. आतड्यांची स्वच्छता आणि पचनक्रिया मजबुत ठेवण्यासाठी मेथीचे दाणे अत्यंत फायदेशीर ठरतात. डायबिटीसच्या रूग्णांसाठी मेथीचे दाणे भिजवून खाणं अत्यंत फायदेशीर असतं. जर तुम्ही दररोज मेथीचे दाणे खात असाल तर ब्लड शुगर लेवल ठिक राहते.

 

अळशी किंवा फ्लॅक्स सीड्स 

अळशीच्या बिया उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. फ्लॅक्स सीड्स म्हणून अळशीच्या बिया ओळखल्या जातात. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा फॅटी 3 अॅसिड मुबलक प्रमाणात आढळतं. वेट लॉससोबतच हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी अळशीच्या बिया उत्तम ठरतात. 

बदाम भिजवून खा

बदाम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. वेट लॉस डाएट प्लॅनमध्ये बदामाचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. बदामामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअम असतात. जे शरीराच्या नर्वस सिस्टिमसाठी अत्यंत ठिक राहतं. बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठीही वेट लॉस डाएट प्लानमध्ये बदामाचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर असतं. 

बदाम भिजवून खाल्याने ते सहज पचतात आणि यातील सर्व पोषक तत्व शरीराला अगदी सहज मिळतात. रात्री भिजवून सकाळी बदाम खाल्याने शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता होत नाही. 

मूग भिजवून खा

प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असतं. याचं नियमित सेवन केल्याने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. यामध्ये पोटॅशिअण आणि मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असल्याने डॉक्टर्स हाय ब्लड प्रेशरने त्रस्त असणाऱ्या रूग्णांसाठी आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. 

मोड आलेले काळे चणे

काळ्या चण्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे वेट लॉस डाएट प्लानमध्ये डाएट एक्सपर्ट्स काळे चणे खाण्याचा सल्ला देतात. काळे चणे भिजवून त्यांना मोड आणून सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन बी 12 सोबतच फायबरही मिळतं. वेट लॉससोबतच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात. 

मनुके
 
शरीरामध्ये रक्ताची कमतरता होत असेल तर मनुके खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला मनुके भिजवून खाणं फायदेशीर ठरतं. मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर ठरतं. 

लठ्ठपणा, एनिमिया, किडनी स्टोन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मनुका फायदेशीर ठरतो. वेट लॉस डाएट प्लानमध्ये मनुक्यांचा समावेश केल्याने वजन वेगाने कमी होण्यासाठी मदत होते. मनुक्यांमध्ये पोटॅशिअम आणि आयर्न असतं. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

 

Web Title: Best immunity booster food for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.