Kidney Health: किडनीसाठी फायदेशीर आहेत हे 3 लेमन ड्रिंक्स, किडनी होईल पूर्णपणे क्लीन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 02:51 PM2022-12-12T14:51:55+5:302022-12-12T14:52:16+5:30

Lemon Drinks for Kidney : रोज तुम्ही एक खास ड्रिंक पिऊन आपली किडनी निरोगी आणि फीट ठेवू शकता. चला जाणून घेऊ किडनी साफ ठेवण्यासाठी कोणतं ड्रिंक कधी आणि कसं प्यावं.

Best lemon drink for kidney benefits, know how to made it and how to drink | Kidney Health: किडनीसाठी फायदेशीर आहेत हे 3 लेमन ड्रिंक्स, किडनी होईल पूर्णपणे क्लीन

Kidney Health: किडनीसाठी फायदेशीर आहेत हे 3 लेमन ड्रिंक्स, किडनी होईल पूर्णपणे क्लीन

googlenewsNext

Lemon Drinks for Kidney : किडनी रक्त शुद्ध करण्याचं आणि शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करते. पण अनेक हे टॉक्सिन किनडीला डॅमेज करतात. अशात किडनी फेल होते. पण रोज तुम्ही एक खास ड्रिंक पिऊन आपली किडनी निरोगी आणि फीट ठेवू शकता. चला जाणून घेऊ किडनी साफ ठेवण्यासाठी कोणतं ड्रिंक कधी आणि कसं प्यावं.

किडनी आपल्या शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करते आणि तरल पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर काढते. त्याशिवाय किडनी मानवी शरीरात सोडिअम, पोटॅशिअम, अॅसिडचं प्रमाणही कंट्रोल करते. सोबतच किडनीमधून ते हार्मोनही रिलीज होतात जे आपल्या शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यासाठी महत्वाचे असतात.

किडनीसाठी फायदेशीर आहे लिंबू

हार्वर्डच्या एका रिपोर्टनुसार, रोज दोन लिंबांचा रस प्यायल्याने यूरिन   साइट्रेट (Urinary Citrate) वाढतं आणि किडनीतून टॉक्सिन बाहेर निघतात. अशात किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. किडनीला हेल्दी बनवणारं हे ड्रिंक तुम्ही सकाळी आणि दुपारच्या वेळी सेवन करू शकता.

किडनी साफ करणारे लेमन ड्रिंक्स (Lemon Drinks for Kidney)

1) पुदीना असलेलं लिंबू पाणी

एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, पुदीन्याची पाने आणि थोडी साखर टाकून चांगलं मिक्स करून घ्या. हे ड्रिंक किडनी हेल्दी ठेवण्यासाठी चांगलं मानलं जातं.

2) मसाला लिंबू सोडा

एका ग्लासमध्ये लिंबाचा रर, जिरे-धणे पावडर, चाट मसाला आणि सोडा चांगलं मिक्स करा. अशाप्रकारे तुमचं किडनीसाठी हेल्दी ड्रिंक झालं.

3) नारळाचं पाणी आणि लिंबू

हे हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात नारळाचं पाणी टाका. या पाण्यात लिंबाचा रस टाकून याचं सेवन करा. याने तुमची किडनी निरोगी आणि फीट राहते.
 

Web Title: Best lemon drink for kidney benefits, know how to made it and how to drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.