झोपण्यासाठी 'ही' पोझिशन आहे सर्वात चांगली, मानेला आणि पाठीला मिळतो आराम...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 02:21 PM2021-06-23T14:21:02+5:302021-06-23T14:23:19+5:30
काही जणांना चूकीच्या स्लीपिंग पोजिशनमुळे पाठ आणि मानदुखी होण्याची समस्या जाणवते. यामुळे झोप तर नीट येत नाहीच पण पाठ आणि मानदुखीमुळे नंतरचा दिवसही त्रासदायक जातो. यासाठीच्या काही टीप्स फॉलो करा...
नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी डाएटसोबतच पुरेशी झोप आवश्यक आहे. काही जणांना चूकीच्या स्लीपिंग पोजिशनमुळे पाठ आणि मानदुखी होण्याची समस्या जाणवते. यामुळे झोप तर नीट येत नाहीच पण पाठ आणि मानदुखीमुळे नंतरचा दिवसही त्रासदायक जातो. त्यामुळेच आम्ही तुम्हाला अशा टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे झोपताना तुमच्या पाठीला आणि मानेला आराम मिळेल.
उशी बदला
तुम्ही वापरत असलेली उशी तुमच्या मान आणि पाठीच्या दुखण्याचे कारण असू शकते. त्यामुळे तुम्ही मोठी आणि कडक उशी वापरली पाहिजे. उपडी झोपणाऱ्यांनी तर पातळ उशी वापरूच नये.
पाठीच्या खाली टॉवेल ठेवा
पाठीवर झोपणाऱ्यांना आपल्या मागील हाडाचा त्रास होऊ नये म्हणून कंबरेखाली टॉवेल ठेवावे त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल.
गुडघ्यांच्या मध्ये उशी घेणे
ज्या लोकांना उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपण्याची सवय असेल त्यांनी डोक्याखाली उशी घेण्यासोबतच दोन गुडघ्यांच्या मध्ये उशी घ्यावी. यामुळे तुम्हाला आाराम मिळेल.
कडक गादीवर झोपा
अनेकांना मऊ गादीवर झोपण्याची सवय असते पण ही सवय चूकीची आहे. यामुळे तुमच्या पाठीवर व मानेवर अधिक ताण येण्याची शक्यता असते त्यामुळे कडक गादीचा वापर करा.
फिजिओथेरपिस्टकडे जा
ज्यावेळी तुम्हाला मानेचे आणि पाठीचे दुखणे असह्य होत असेल आणि ते बरे होत नसेल तर फिजिओथेरपिस्टकडे जा. ते तुम्हाला मानेचे आणि पाठीचे स्नायु बळकट करण्यास मदत करतील तसेच तशापद्धतीचे काही सोपे व्यायामही सांगतिल.