रात्री चांगली झोप येत नाही? लगेच वापरा 'हा' बाबा रामदेव यांचा आयुर्वेदिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:36 AM2024-03-01T10:36:48+5:302024-03-01T10:37:31+5:30

चांगली झोप लागण्यासाठी बाबा रामदेव यांनी काही बेस्ट आयुर्वेदिक उपाय सांगितले आहे.

Best sleep with this Ayurvedic home remedy suggested by Baba Ramdev | रात्री चांगली झोप येत नाही? लगेच वापरा 'हा' बाबा रामदेव यांचा आयुर्वेदिक उपाय

रात्री चांगली झोप येत नाही? लगेच वापरा 'हा' बाबा रामदेव यांचा आयुर्वेदिक उपाय

How To Sleep Better: आजकाल लोकांना चांगली झोप न येण्याची समस्या होते. तणाव, एंझायटी आणि स्लीप डिसऑर्डर 'इन्सोम्निया' यामागची मुख्य कारणे असू शकतात. ही समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं खातात. पण पुन्हा पुन्हा औषधांचं सेवन करून शरीराचं नुकसान होतं. अशात चांगली झोप लागण्यासाठी बाबा रामदेव यांनी काही बेस्ट आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत.

खसखस आणि मखाना

बाबा रामदेव यांच्यानुसार, स्वामी रामदेव यांच्यानुसार खसखस आणि मखानामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. मखान्यात प्रोटीन, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट, हेल्दी फॅट, फॉस्फोरस आणि आयर्न भरपूर असतं. त्याशिवाय मखान्यात सोडिअम, व्हिटॅमिनही भरपूर असतात. तसेच खसखसमध्ये फायबर, कार्ब्स, प्रोटीन आढळतात. अशात जर तुम्ही या दोन्ही गोष्टी दुधात मिक्स करून सेवन केल्या तर थकवा, तणाव आणि चिंता कमी होते यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.

अश्वगंधाही फायदेशीर

अश्वगंधामध्येही अनेक तत्व असतात. याने अनेक आजार दूर करण्यास मदत मिळते. याचा अनेक उपचारांमध्ये वापर केला जातो. आयुर्वेदानुसार, ज्या लोकांना तणाव, चिंता आणि थकवा या कारणांमुळे झोप येत नाही ते याची मदत घेऊ शकतात. याने स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलची लेव्हल कमी होते आणि झोप चांगली येते.

सर्पगंधा

सर्पगंधाला सर्पेंटाइन आणि स्नेक रूट नावानेही ओळखलं जातं. ज्यांना झोप न येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरतं. सर्पगंधाने शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप येण्यास मदत मिळते. यात औषधी गुण असतात. 

Web Title: Best sleep with this Ayurvedic home remedy suggested by Baba Ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.