'ही' आहे डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाण्याची योग्य वेळ; रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 04:07 PM2019-05-14T16:07:54+5:302019-05-14T16:13:51+5:30
अमेरिकेतील फिलाडेल्फियाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून एक नवीन गोष्ट समोर आली आहे. या संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, डॉक्टरांकडे उपचारासाठी जाण्याची सर्वात उत्तम वेळ ही सकाळी 8 वाजताची आहे.
(Image Credit : Pain News Network)
अमेरिकेतील फिलाडेल्फियाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून एक नवीन गोष्ट समोर आली आहे. या संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, डॉक्टरांकडे उपचारासाठी जाण्याची सर्वात उत्तम वेळ ही सकाळी 8 वाजताची आहे. संशोधनानुसार, सकाळच्या वेळी डॉक्टर रूग्णांना स्क्रिनिंग टेस्ट करायला सांगण्याची शक्यता अधिक असते. पण तेच दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी डॉक्टरांकडे गेल्यावर ते गंभीर आजारांनाही स्क्रिनिंग टेस्ट करण्यासाठी सांगण्याची शक्यता फार कमी असते.
19,254 महिला रूग्णांना संशोधनामध्ये सहभागी करण्यात आलं
यूनिवर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया आणि जॉन हॉप्किन्स यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी 19 हजार 254 महिला रूग्णांवर संशोधन केलं. या सर्व महिला रूग्ण ब्रेस्ट किंवा कोलोरेक्टल कॅन्सरने पीडित होत्या, ज्यांना स्क्रिनिंग टेस्टची गरज होती.
(Image Credit : MIMS General News)
सकाळी 8 वाजण्याची वेळ डॉक्टरांकडे जाण्याची उत्तम वेळ
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जसा जसा दिवस संपत जातो, तसंतसं डॉक्टरांवरही रूग्णांना तपासण्याचं किंवा कामाचं प्रेशर वाढत जातं. त्यामुळे दिवस संपताना या गोष्टीची शक्यता वाढत जाते की, डॉक्टर रूग्णांना गरज असतानाही कोणतही स्क्रिनिंग करण्याची परवानगी देत नाहीत. या संशोधनातून हेदेखील समोर आले की, डॉक्टरांकडून सर्वात जास्त ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट करण्याचा सल्ला सकाळी 8 वाजता देण्यात आला होता. त्यापेक्षा फार कमी वेळ सकाळ 11 आणि संध्याकाळी 5 वाजता स्क्रिनिंग टेसट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रिनिंगबाबतही काहीसं असचं करण्यात आलं होतं.
निर्णय घेताना थकवा जाणवणं
decision fatigue म्हणजे निर्णय घेताना थकवा जाणवण्याचा परिणाम दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेन्ट घेण्याऱ्या रूग्णांमध्ये दिसून येतं. उदाहरणार्थ, इन्फ्लूएंजा वॅक्सिनेशन रेट ज्याची सुरुवात सकाळच्या वेळी 44 टक्क्यांनी झाली होती. तिच दिवस संपता संपता 32 टक्क्यांवर आली होती. संशोधनाचे निष्कर्ष आणखी एका गोष्टीकडे इशारा करतात की, दिवस संपताना जर एकदा रूग्ण डॉक्टरांकडे जात असेल तर डॉक्टरांकडून गरज नसलेल्या अॅन्टीबायोटिक्स प्रिस्क्राइब करण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर हॉस्पिटलची शिफ्ट संपताना डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टाफद्वारे हॅन्डवॉशिंगही केलं जात नाही.
या संशोधनामध्ये या गोष्टीवर लक्ष देण्यात आलं आहे की, निर्णय घेताना जाणवणारा थकवा, जायग्नोस्टिक्स आणि हेल्थ केयरवर काय आणि कसा परिणाम होतो.
टिप : वरील गोष्टी या संशोधनातून सिद्ध करण्यात आलेल्या आहेत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.