वजन कमी करण्यासाठी परफेक्ट फॅट फ्लश डाएट प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:20 PM2019-05-27T12:20:31+5:302019-05-27T12:30:49+5:30

वजन कमी करणं हे अनेकांपुढे एक मोठं आव्हानच ठरलं आहे. पण अनेकदा अनेकांना हे माहितीच नसतं की, वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराच्या गरजा काय आहेत.

The best way to lose weight is fat flush diet plan | वजन कमी करण्यासाठी परफेक्ट फॅट फ्लश डाएट प्लॅन!

वजन कमी करण्यासाठी परफेक्ट फॅट फ्लश डाएट प्लॅन!

googlenewsNext

(Image Credit : Daily Star)

वजन कमी करणं हे अनेकांपुढे एक मोठं आव्हानच ठरलं आहे. पण अनेकदा अनेकांना हे माहितीच नसतं की, वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराच्या गरजा काय आहेत. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळे डाएट प्लान सांगत असतात. काहींना त्याचा फायदा होतो तर काहींना होत नाही. असाच एक डाएट प्लान आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या डाएट प्लानने वजन कमी होण्यासोबतच बॉडी डिटॉक्सही होईल.

फॅट फ्लश डाएट प्लान

वजन कमी करण्यासाठी आजकाल फॅट फ्लश डाएट प्लान चांगलाच चर्चेत आहे. हा डाएट प्लान न्यूट्रिशनिस्ट ऐन लूइसे गिटलमॅन यांनी तयार केला आहे. या डाएट प्लानने वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल आणि सोबतच बॉडी डिटॉक्सिफाय सुद्धा होईल.

कुणी तयार केला हा प्लान

ऐन लुईस गिटलमॅन एक अमेरिकन लेखक आणि अल्टरनेट मेडिसिनच्या समर्थक आहेत. तसेच त्या एक न्यूट्रिशनिस्ट आहेत. दोन डझनपेक्षा अधिक पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी फॅट फ्लश प्लानवर एक पुस्तकही लिहिलं आहे. 'बिऑंड प्रिटिकिन' असं या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं.

वजन कमी कसं होतं?

लिव्हरचं कार्य फॅट बर्निंगसाठी अधिक चांगलं करणं हा या डाएट प्लानचं मुख्य उद्देश आहे. असं योग्य आहाराच्या मदतीने केलं जातं. या डाएट प्लानमधील आहारामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होतं आणि शरीरातील फॅट वेगाने कमी होऊ लागतं. तसेच तरल पदार्थ बाहेर काढणारी प्रणाली सुद्धा याने सक्रिया होते. 

फॅट फ्लश डाएट प्लान करण्याची पद्धत

फॅट फ्लश डाएट प्लान तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केली जाते. त्यात डिटॉक्स, वेट लॉस आणि वजन नियंत्रित ठेवणे यांचा समावेश आहे. वजन कमी करण्याच्या फॅट फ्लश डाएट प्लानच्या पहिल्या टप्प्यात लिव्हर आणि लाइम्फॅटिक सिस्टीमला डिटॉक्स करण्यावर अधिक लक्ष दिलं जातं. तसेच या डाएट प्लानमध्ये एक्सरसाइजही महत्त्वाची भूमिका बजावते. 

पहिला टप्पा 

(Image Credit : Quick and Dirty Tips)

पहिल्या टप्प्यामध्ये यात क्रेनबेरी ज्यूस आणि पाणी एकक्ष करून सेवन केलं जातं. जेणेकरून शरीर डिटॉक्स केलं जावं आणि वॉटर रिटेंशन कमी केलं जावं. रोज हे मिश्रण सेवन केलं जातं. यादरम्यान कॅलरीचं प्रमाण १, १०० ते १,२०० प्रतिदिवस ठेवलं जातं. यात गहू आणि डेअरी पदार्थ खाण्याची मनाई आहे.

दुसरा टप्पा

(Image Credit : Sharecare)

या डाएटच्या दुसऱ्या टप्प्यात कॅलरी जरा वाढवून घेण्यात परवानगी दिली जाते. सोबतच डाएटमध्ये थोड्या कार्ब्सचाही समावेश करू शकता. यात वजन कमी करण्यावर भर दिला जातो.

तिसरा टप्पा

(Image Credit : Odishatv)

फॅट फ्लश डाएटच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात तुम्हाला कमी केलेलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तयार केलं जातं. यात काही मोजक्याच डेअरी प्रॉडक्टचा वापर करण्याची परवानगी दिली जाते. 

हा डाएट प्लान एक्सरसाइजसोबत अधिक प्रभावी मानला गेला आहे. पण कोणताही डाएट प्लान फॉलो करताना आहारात ठरवून दिल्याप्रमाणे आणि कोणताही बदल न करता घ्यायला हवा. तसेच हा डाएट प्लान फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

Web Title: The best way to lose weight is fat flush diet plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.