भात बनवण्याची अशी पद्धत ज्यामुळे वाढणार नाही वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 02:43 PM2024-03-20T14:43:18+5:302024-03-20T14:44:56+5:30
Best Way cooking Rice : जर तुम्हाला वजनही कमी करायचंय आणि भातही खायचाय, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक खास पद्धत सांगणार आहोत.
Best Way cooking Rice : वजन वाढत असलेल्या लोकांमध्ये असा गैरसमज असतो की, भात किंवा बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं. पण खरंच असं असतं का? खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? तर यावर एक्सपर्टने आपलं मत नोंदवलं आहे. भातात कॅलरी जास्त असतात. पण जर तुम्हाला वजनही कमी करायचंय आणि भातही खायचाय, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक खास पद्धत सांगणार आहोत.
अशा कमी करा भातातील कॅलरी
अभ्यासकांनुसार, भातातील कॅलरी तुम्ही घरीच कमी करू शकता. अर्धी वाटी पांढरे तांदूळ घ्या, त्यात एक चमचा खोबऱ्याचं तेल टाका. त्यानंतर हे उकडलेल्या पाण्यात टाका. नंतर उकडलेल्या पाण्यात हे तांदूळ 40 मिनिटे शिजवा. तांदूळ शिजल्यावर भात 12 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर तुम्ही हा भात थंड किंवा हलका गरम करून खाऊ शकता.
कशा कमी झाल्या कॅलरी?
वर सांगितल्याप्रमाणे तांदूळ शिजवल्यास भातातील कॅलरी कमी होतात. तज्ज्ञ सांगतात की, अशाप्रकारे तांदूळ शिजवून जेव्हा थंड केले जातात तेव्हा यातील ग्लूकोज मोलिक्यूल्स टाइट बॉंड्स तयार करतात. यालाच रेसिस्टेंट स्टार्च म्हटले जाते. म्हणजे अशाप्रकारे तांदूळ शिजवल्याने आपली पचन संस्था याला पूर्णपणे शोषूण घेत नाही, म्हणजे सर्वच कॅलरी ग्रहण होत नाहीत. म्हणजे एकंदर काय होतं की, यात असलेल्या तत्त्वांचा स्वीकार आपलं शरीर करत नाही. अशाप्रकारे हा भात आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
खोबऱ्याच्या तेलाची भूमिका
अशाप्रकारे शिजवण्यात आलेल्या तांदूळामध्ये खोबऱ्याच्या तेलाची महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. खरंतर खोबऱ्याच्या तेलामध्ये मीडियम चेन फॅटी अॅसिड असतं. हे इतर फॅटी पदार्थांच्या तुलनेत चांगलं असतं.
साऊथ इंडियन लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?
एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमधील लोक इतका भात खातात तरीही त्यांना काही होत नाही. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो.
भात बनवण्याची आणखी एक योग्य पद्धत
एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमध्ये भात बनवण्याची पद्धत त्यांना लठ्ठ होऊ देत नाही. साऊथमध्ये लोक सामान्य तांदळाचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भात शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करत नाहीत. ते पातेल्यात भात शिजवतात. पातेल्यात भात शिजवताना त्यात जो फेस येतो तो ते काढून टाकतात. मुळात तांदळाच्या पाण्यावर येणारा फेसच लठ्ठपणासहीत अनेक आजारांचं कारण बनतो. त्यामुळे भात नेहमी पातेल्यात शिजवा.