धमन्यांमध्ये जमा होणारं प्लाक ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण,असा करा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:55 PM2020-04-15T13:55:45+5:302020-04-15T14:07:33+5:30
जास्त फॅट्स असलेल अन्नपदार्थ आणि अनियमीत जीवनशैली आपल्या आयुष्याचा भाग बनली आहे.
हृदयातून संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह होत असतो. त्यामुळेच आपलं शरीर सुरळीत कार्य करत असतं. पण हृदयाच्या नसांमध्ये काहीही समस्या निर्माण झाल्यास चिंतेच कारण असू शकतं. सर्वाधिक ३५ चे ४० वयातील लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकने होतो. हार्ट अटॅकचं सगळ्याचं मोठं कारण धमन्यांमध्ये जमा झालेले प्लाक हे आहे. कारण जास्त फॅट्स असलेल अन्नपदार्थ आणि अनियमीत जीवनशैली आपल्या आयुष्याचा भाग बनली आहे.
हृदयातील आर्टरीजमध्ये जमा झालेले प्लाक ब्लॉकेजचं कारण ठरतात. धमन्यांमध्ये प्लाक जमा झाल्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचू शकत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक येतो. आर्टरीज प्रमुख काम हृदयाद्वारे पंप केले जाणारे रक्त शरीरात पोहोचवण्याचं असतं. वाढत्या वयात प्लाक जमा होण्याची समस्या वाढत जाते. धमन्यांमध्ये प्लाक जमा होणं हे जीवघेणं ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला यापासून बचावाचे उपाय सांगणार आहोत. जेणेकरून जमा आर्टरीजमध्ये जमा होत असलेल्या प्लाकला रोखता येऊ शकतं.
नियमित व्यायाम केल्याने तुमचं शरीर चांगलं राहील. त्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉचं प्रमाण वाढणार नाही. रोज व्यायाम केल्याने शरीराच एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होत नाही.
ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यासाठी मीठ फार महत्वाचे असते. पण प्रमाणाबाहेर मीठा खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आहारात मीठाचे प्रमाण योग्य ठेवले पाहिजे.
रोज ओमेगा -3 फॅटी एसिड असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा त्यामुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील, आहारात रोज दोन चमचे ऑलिव्ह ऑईल जाऊ द्या. फळे आणि भाज्या, कडधान्य यांचा आहारात समावेश करा. जेवणाची वेळ चुकवू नका. तेलकट पदार्थ टाळा. यामुळे हृदय तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होईल.
पुरेशा झोपेमुळे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मोठी मदत होते. पुरेशी झोप नसेल तर उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. रोज ८ तासांची झोप व्हायलाच हवी.
तंबाखूत असलेला कार्बन मोनॉक्साईड रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो. त्यामुळे हृदयाला शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यामध्ये बाधा येते. परिणामतः हृदयाचे ठोके वाढतात. तसंच धुम्रपानामुळे धमन्यांचे सुद्धा नुकसान होते. त्यामुळे हृदयाच्या विकारांपासून लांब राहायचं असेल तर मादक पदार्थांचे सेवन करू नका.