सावधान! फास्टफूडमुळे मुलांना स्टोन आणि कॅन्सर, कुपोषणही वाढतेय; नव्या संशोधनातून माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 06:19 AM2024-04-01T06:19:47+5:302024-04-01T06:20:08+5:30
Children's Health: सध्या मुले मोठ्या प्रमाणात बाहेरचे खाद्यपदार्थ खात असून, जास्त फास्ट फूड खाल्ल्याने मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. बमेडमध्ये प्रकाशित संशोधनात या दोन्ही आजारांसाठी फास्ट फूडला जबाबदार धरले आहे.
नवी दिल्ली - सध्या मुले मोठ्या प्रमाणात बाहेरचे खाद्यपदार्थ खात असून, जास्त फास्ट फूड खाल्ल्याने मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. बमेडमध्ये प्रकाशित संशोधनात या दोन्ही आजारांसाठी फास्ट फूडला जबाबदार धरले आहे. मुलांच्या खाण्याच्या सवयींवर केलेल्या या संशोधनानुसार मोमोज, पॅकेज्ड स्नॅक्स, पिझ्झा, कोल्ड ड्रिंक्स, नूडल्स, मंच्युरियन हे लहान मुलांचे शरीर पोकळ करत आहेत. यामुळे मुलांमध्ये कुपोषण वाढत आहे. ही समस्या वाढून मुलांना स्टोन आणि गुदाशय कर्करोग होत आहे.
फास्ट फूड खाल्याने कुपोषण आणि पोटासंबंधी आजार वाढतात. स्टोनचा त्रास असलेल्या मुलांमध्ये कुपोषणाची ससस्या दिसून येते. फास्ट फूड हेदेखील यामागचे प्रमुख कारण आहे. मुलांच्या वाढीसाठी योग्य आहार आणि खेळ आवश्यक आहेत.
- डॉ. अमित जैन, यूरोलॉजिस्ट
मीठ, साखर आणि ट्रान्सफॅट घातक
फास्ट फूडमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ, साखर आणि ट्रान्सफॅट असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्टोन आणि टाइप-टू मधुमेहाचाही धोका वाढत आहे.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
- जास्त थकवा आणि अस्वस्थता
- पाठ आणि ओटीपोटात वेदना, विशेषत: पाठीच्या खाली
- लघवी करताना वेदना
- उलटी येणे
आरामदायी जीवनशैली घातक
- पीजीआय लखनौमध्ये २५० मुलांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये फास्ट फूडचे अतिसेवन आणि आरामदायी जीवनशैली मुलांसाठी घातक असल्याचे दिसून आले.
- मुलांच्या या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीरात बॅड फॅट वाढण्यासोबतच स्टोनची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.