या दोन अवयवांवर खाज येणे आहे लिव्हरच्या या गंभीर आजाराचा संकेत, या 8 लोकांना राहतो जास्त धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 12:18 PM2022-08-05T12:18:18+5:302022-08-05T12:18:52+5:30
Fatty Liver : क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, हेल्दी लिव्हरमध्ये फॅटचं एक निश्चित प्रमाण असतं. पण हे प्रमाण जर लिव्हरच्या वजनाच्या 5 ते 10 टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर हे फॅटी लिव्हरचा आजार किंवा स्टीटोसिसचं कारण बनतं.
Fatty Liver : लिव्हर शरीरातील सर्वात महत्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवणं फार महत्वाचं आहे. अशात लिव्हरमध्ये एक्स्ट्रा फॅट जमा झाल्याने वेगवेगळे आजार होऊ शकतात. याला फॅटी लिव्हर म्हणतात. हे दोन प्रकारचे असतात अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर.
क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, हेल्दी लिव्हरमध्ये फॅटचं एक निश्चित प्रमाण असतं. पण हे प्रमाण जर लिव्हरच्या वजनाच्या 5 ते 10 टक्क्यांपेक्षा अधिक होत असेल तर हे फॅटी लिव्हरचा आजार किंवा स्टीटोसिसचं कारण बनतं. यात काळानुसार रूग्णाची स्थिती गंभीर होते. यादरम्यान त्यांना लिव्हरवर सूज, फायब्रोसिस आणि सिरोसिससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ही एक अशी स्थिती आहे जी जास्त दारू प्यायल्याने सेवन केल्याने होते.
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार त्या लोकांमध्ये होतो जे फार कमी किंवा अजिबातच दारूचं सेवन करत नाही. हा आजार फार जास्त कॅलरीचं सेवन केल्याने होतो. हा आजार लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट निर्माणाशी जुळलेला आहे.
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमध्ये दिसतात हे अजब लक्षण
क्लीवलॅंड क्लीनिकच्या तज्ज्ञांनी सांगितलं की, हात आणि तळपायांवर सायंकाळी किंवा रात्री खाज येत असेल तर हा फॅटी लिव्हरचा संकेत असू शकतो. त्याशिवाय पोटावर सूज, त्वचेच्या ठीक आधी वाढलेल्या रक्तवाहिका, वाढलेल्या प्लीहा, लाल तळहात, काविळसारखे लक्षणे दिसतात. मायो क्लीनिक केअर नेटवर्कनुसार, फॅटी लिव्हर आजारात खाजेच्या केसेस कमीच असतात.
लिव्हरच्या आजारात खाज का येते?
वैज्ञानिकांना अजूनही लिव्हरच्या आजारात खाज येण्याचं कारण समजू शकलेलं नाही. पण काही वैज्ञानिकांचं मत आहे की, याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ज्यात लिव्हरचा आजार असलेल्या लोकांच्या त्वचेच्याखाली पित्ताच प्रमाण जास्त होणं हेही एक कारण असू शकतं.
कुणाला असतो फॅटी लिव्हरचा धोका
हाय कोलेस्ट्रॉल, हाय ट्राइग्लिसराइड, लठ्ठपणा, PCOS, हायपोथायरायडिज्म, मेटाबॉलिक सिंड्रोम, स्लीप एप्निया, टाइप 2 डायबिटीज आणि वयस्कांमध्ये या आजारांचा धोका जास्त असतो.