सावधान! तुमच्या चिमुकल्यांना लागेल चष्मा, अधिक वेळ स्क्रीन पाहणे धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 02:17 PM2023-08-20T14:17:00+5:302023-08-20T14:17:12+5:30
जास्त वेळ मोबाइलची स्क्रीन पाहत राहणे आणि सूर्यप्रकाशात कमी जाणे हे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहे.
नवी दिल्ली : जास्त वेळ मोबाइलची स्क्रीन पाहत राहणे आणि सूर्यप्रकाशात कमी जाणे हे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. यामुळे अडीच ते सहा वर्षे वयोगटांतील जवळपास ४३ टक्के प्री-स्कूलला जाणाऱ्या मुलांची दृष्टी खराब झाली आहे.
नवी दिल्लीतील १७२३ मुलांच्या डोळ्यांची नुकतीच तपासणी करण्यात आली असता त्यांची दृष्टी इतकी खराब झाली आहे की त्यातील प्रत्येक पाचव्या मुलास त्वरित चष्मा लावणे आवश्यक असल्याचे समोर आले.
ती तीन कारणे...
अभ्यासात मुलांची दृष्टी
कमी होण्याची तीन कारणे सांगितली गेली.
मुलांचे बाहेर जाऊन कमी खेळणे, सूर्यप्रकाशात कमी येणे आणि जास्त वेळ स्क्रीन (टीव्ही, मोबाइल) पाहणे यांचा समावेश.
दोन तास मैदानी खेळ खेळा
मुलांचे डोळे निरोगी राहण्यासाठी त्यांना दोन तास मैदानी खेळ तसेच डोळ्यांना सूर्यप्रकाश मिळायला हवा. स्क्रीन टाइम कमी व पौष्टिक अन्नही खाणे डोळ्यांसाठी आवश्यक आहे.
वर्षातून किती वेळा डोळे तपासावेत?
२०५० पर्यंत ५० टक्के लोकसंख्या मायोपिया (मायनस नंबर) या आजाराने ग्रस्त असेल. अशा स्थितीत वयाच्या तीन वर्षांपासून मुलांच्या डोळ्यांची तपासणी अनिवार्यपणे करणे आहे. वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.
- डॉ. नुती शहा, बालनेत्ररोगतज्ज्ञ