बीडी ओढल्याने भारताला झाले 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:56 AM2018-12-31T10:56:52+5:302018-12-31T11:03:53+5:30
सिगारेटप्रमाणेच भारतात बीडीचाही धुम्रपान करण्यासाठी वापर करण्यात येतो. बीडी ओढणाऱ्या लोकांचा एक मोठा गट असून व्यसन म्हणून अनेक लोक बीडी ओढत असतात.
सिगारेटप्रमाणेच भारतात बीडीचाही धुम्रपान करण्यासाठी वापर करण्यात येतो. बीडी ओढणाऱ्या लोकांचा एक मोठा गट असून व्यसन म्हणून अनेक लोक बीडी ओढत असतात. बीडीच्या अतिसेवनाने झालेल्या आजारांमुळे आणि अकाली मृत्यूमुळे भारतात वर्ष 2017मध्ये 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे.
सिगारेटपेक्षाही बीडी भारतामध्ये फार लोकप्रिय असून धूम्रपानासाठी लागणारा तंबाखूचा 81 टक्के भाग यामध्ये वापरण्यात येतो. देशाभरात वयाच्या 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 7.2 कोटी लोक बीडी ओढतात.
'टोबॅको कंट्रोल' या मासिकातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार, केरळमधील 'सेन्टर फॉर पब्लिक पॉलिसी रिसर्च' (सीपीपीआर) ने केलेल्या रिसर्चनुसार, बीडीमध्ये सामान्य सिगारेटच्या तुलनेत कमी तंबाखू वापरण्यात आलेली असते. परंतु यामध्ये निकोटिनचा स्तर जास्त असतो. तसेच सिगारेटच्या तुलनेत बीडी हळूहळू जळते. अशातच ती ओढणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात जास्त रसायन प्रवेश करतं.
ज्याप्रमाणे सिगारेटच्या अतिसेवनाने अनेक श्वसनासंदर्भातील आजारांचा सामना करावा लागतो, त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात बीडी ओढल्याने कॅन्सर, टीबी, फुफ्फुसासंबंधातील अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तरिदेखील सिगारेटच्या तुलनेत बीडीवर अत्यंत कमी कर आकारण्यात येतो.
भारतात आतापर्यंत कधीही बीडी ओढल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानाचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. आर्थिक नफा आणि नुकसानासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, आजार आणि अकाली मृत्यूमुळे भारताला 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान झाले आहे.
सर्व खर्च म्हणजेच, मेडिकल तपासणी, औषधं, डॉक्टरांची फी, हॉस्पिटलचा खर्च हे सर्व एकत्र करून आतापर्यंत जवळपास 168.7 अब्ज रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अप्रत्यक्ष खर्च म्हणजेच, नातेवाईकांचा राहण्याचा खर्च, काळजी घेणं, जेवण आणि कर्ता माणूस आजारी पडल्यामुळे घरामध्ये येणारे उत्पन्न कमी झाले, त्यामुळे यांसारख्या गोष्टींचा एकत्रितरित्या 811.2 अब्ज रूपये नुकसान झाले आहे.