मोठा प्रश्न? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर टेस्ट जरुरी आहे का? CDC चे उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 01:31 PM2021-06-05T13:31:59+5:302021-06-05T13:33:08+5:30

Corona vaccine second dose: कोरोना आणि लसीकरणावरून हळू-हळू लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहेत. आता नवा प्रश्न असा आहे की, जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर कोरोना चाचणी (Corona Testing) करणे गरजेचे आहे का?

Big question Is the test necessary after taking both doses of corona vaccine? CDC's answer ... | मोठा प्रश्न? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर टेस्ट जरुरी आहे का? CDC चे उत्तर...

मोठा प्रश्न? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर टेस्ट जरुरी आहे का? CDC चे उत्तर...

googlenewsNext

कोरोना आणि लसीकरणावरून (Corona Vaccination questions) लोकांच्या मनात अनेक प्रश्न उठत आहेत. कारण ही महामारी सर्वांसाठी नवीन आहे. यामुळे हळू-हळू लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहेत. आता नवा प्रश्न असा आहे की, जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर कोरोना चाचणी (Corona Testing) करणे गरजेचे आहे का? अमेरिकेच्या सीडीसीने यावर उत्तर दिले आहे. (is corona testing necessary after taking second dose of corona vaccine)

Sputnik V Exclusive: रशियात राहणाऱ्या ठाणेकरानं घेतलेत Sputnik V चे दोन्ही डोस; जाणून घ्या त्यांचा अनुभव अन् लसीचे साईड इफेक्ट


अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शन (सीडीसी) नुसार जर तुम्ही कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या असतील तर तुम्हाला कोरोना टेस्ट करणे किंवा क्वारंटाईन होण्याची गरज राहणार नाही. जरी तुम्ही एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तरी देखील याची गरज राहणार नाही. 


कोरोनावर नवीन संशोधनातून हे नवीन गाईडलाईन देण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना कोरोनाचे गंभीर संक्रमण होण्याचा धोका कमी आहे. संशोधनाच्या दाव्यानुसार जरी तुम्हाला कोरोना झाल तरी देखील तुमच्यापासून तो दुसऱ्यांना होण्याचा आणि लक्षणे दिसण्याचा धोका कमी असतो.


सीडीसीनुसार जर कोणत्याही व्यक्तीने दोन्ही व्हॅक्सिन घेतल्या असतील तर त्याला स्क्रिनिंगचीदेखील गरज नाही. कोरोनाचा धोका पाहून आजही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची तपासणी करतात. अॅमेझॉनने आजपासून यावर वेळ घालवू नका असे आदेश दिले आहेत. अॅमेझॉनने कर्मचाऱ्यांची स्क्रीनिंग याच सूचनेवरून थांबिविली आहे. असे असले तरी देखील परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या अमेरिकी नागरिकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आणण्याची सूचना केली आहे. 

यावरून अमेरिकेमध्ये तज्ज्ञांचे दोन गट प़डले आहेत. सीडीसीने काही टेस्टिंग गाईडलाईन्स थोड्या बदलाव्यात. सध्याच्या संकटात सामान्य ताप आणि व्हायरसदेखील कोरोना व्हायरसकडे इशारा करतात. यामुळे टेस्टिंग क्षमतेवर दबाव वाढतो. 
 

Web Title: Big question Is the test necessary after taking both doses of corona vaccine? CDC's answer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.