जास्तीत जास्त पुरूष करतात ही चूक, त्यांचं चालणं-फिरणंही होईल अवघड!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:44 PM2023-01-31T13:44:34+5:302023-01-31T13:45:20+5:30
Wallet kept back pocket : डॉक्टरांनुसार तुमच्या पॅंटच्या मागच्या खिशात आरामात ठेवलेल्या या पाकिटामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Wallet kept back pocket : ज्याचं पाकीट जितकं जास्त मोठं तितका तो व्यक्ती मोठा असणार, असे मानले जाते. अनेकजण छोट्याशा पाकिटात पैशांसोबत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, व्हिजिटींग कार्ड, लायसन्स, आयडी प्रूफ आणि इतरही काही गोष्टी ठेवतात. पण या इतक्या गोष्टी ठेवून तुम्ही अनेक अडचणींना निमंत्रण देताय. डॉक्टरांनुसार तुमच्या पॅंटच्या मागच्या खिशात आरामात ठेवलेल्या या पाकिटामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
1) सोसायटी फॉर अल्जायमर अॅन्ड एजिंग रिसर्चचे जनरल सेक्रेटरी धिकव सांगतात की, मागच्या खिशात ठेवलेलं वजनी, जाडजूड पाकीट तुमच्या हिप जॉईंट आणि कमरेच्या खालच्या भागात त्रास निर्माण करु शकतं. कमरेत एक सायटीका नावाची नस असते. जेव्हा आपण हे जाड पाकीट मागच्या खिशात ठेवून बसतो, तेव्हा सायटीका नस दबली जाते. ही नस दबली गेल्याने हिप जॉईंट आणि कमरेच्या खाली दुखणं सुरु होतं.
2) रोज याप्रकारचं दुखणं होत असेल तर याला पिरीफोर्मिंस सिंड्रोम म्हटले जाते. मागच्या खिशात जाड पाकीट ठेवल्याने तुमचा पार्श्वभाग एका बाजूला झुकला जातो. त्यामुळे तुमच्या पाठिच्या कण्यावर अधिक भार पडतो. सरळ बसण्याऐवजी कमरेच्या खालचा भाग इंद्रधनुष सारका वाकडा बनतो. याने पाठिचा कणाही वाकडा होऊ शकतो. असे झाले तर हे महागात पडू शकतं.
3) डॉ. धिकव यांचं म्हणनं आहे की, याप्रकारच्या सर्वात जास्त समस्या या विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतात. विद्यार्थी 8-8 तास पाकीट खिशात ठेवून बसलेले असतात. आमच्याकडे याप्रकारचे 20 ते 25 रुग्ण येतात.
4) कालरा हॉस्पिटलचे डॉ. आर.एन कालरा सांगतात की, ही समस्या तरुण, वजन जास्त असलेल्या आणि जास्त वेळ बसून राहणाऱ्यांमध्ये आढळते. ही समस्या असणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. वेळेवर यावर उपचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही पाकीट मागच्या खिशात टाकून न बसण्याचा सल्ला देत असतो.
काय घ्याल काळजी?
मागच्या खिशात पाकीट ठेवून जास्त वेळ बसू नका.
हिप स्ट्रेचिंगचा व्यायाम करा.
10 मिनिटांसाठी जागेवरुन उठून एकडे-तिकडे फेऱ्या मारा.
बसताना पाकीट बॅगमध्ये काढून ठेवा.