कोविड 19 मधून बऱ्या होणाऱ्या आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये 'हा' आहे सगळ्यात मोठा फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 05:53 PM2020-07-19T17:53:31+5:302020-07-19T17:55:04+5:30
CoronaVirus News : या पेशी दोन प्रकारे तयार होत असतात. एका प्रकारे व्हायरसपासून बचावाचे काम होते. तर दुसऱ्या पेशी व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात. अशा पेशींना किलर सेल्स असं सुद्धा म्हणतात.
बॅक्टेरिया किंवा व्हायरसशी लढण्याची क्षमता प्रत्येकात वेगवेगळी असते. आजारांपासून बचाव करणं हे रोगप्रतिकारकशक्तीवर अवलंबून असतं. एका अभ्यासानुसार कोरोनामुळे होत असलेले मृत्यू आणि कोरोनातून बरे होणारे लोक यांमध्ये मोठा फरक आहे. कारण प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडत असतो. जेव्हा शरीरावर कोणत्याही व्हायरसचं आक्रमण होतं तेव्हा इम्यून सिस्टिम टी सेल्स निर्माण करते. या पेशी दोन प्रकारे तयार होत असतात. एका प्रकारे व्हायरसपासून बचावाचे काम होते. तर दुसऱ्या पेशी व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात. अशा पेशींना किलर सेल्स असं सुद्धा म्हणतात.
अमेरिकेतील पेन्सिलवेनिया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या गंभीर स्थितीतील रुग्णांमध्ये टी सेल्सचे हे कार्य दिसून आले आहे. शरीरात तीन प्रकारचे 'इम्युनोटाइप्स' असतात. पहिल्या इम्युनोटाइप्समध्ये काही रुग्णांच्या शरीरात साहाय्याक पेशींची संख्या जास्त असते. त्यामुळे अनेकदा किलर सेल्स दाबल्या जातात. म्हणजेच व्हायरसबाबत कल्पना असतानाही शरीरातील किलर सेल्सची संख्या कमी असते.
दुसऱ्या इम्यूनोटाईपमध्ये किलर सेल्सची संख्या जास्त प्रमाणात असते. म्हणजेच व्हायरसशी लढण्यासाठी या रुग्णांच्या शरीरातील किलर सेल्स एक्टिव्ह असतात. सहाय्यक पेशींची संख्या कमी असते. यामुळे प्रत्येकाच्या शरीरात व्हायरसशी लढण्याची क्षमता वेगवेगळी असते. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार दुसऱ्या म्यूनोटाईपमध्ये कोरोना व्हायरसने गंभीर स्वरुपात संक्रमित झाल्यानंतरही जीवंत बाहेर येता येऊ शकतं.
तिसऱ्या इम्युनोटाइपमध्ये अशी स्थिती असते. ज्यात कोणत्याही प्रकारच्या टी सेल्सचं उत्पादन होऊ शकत नाही. म्हणजेच व्हायरसशी लढण्याची क्षमता कमी असल्यामुळे व्हायरसचा प्रभाव जास्त असल्यास मृत्यू होऊ शकतो. हा रिसर्च १२५ रुग्णांवर करण्यात आला होता. जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारच्या रोगप्रतिकारकशक्तींबाबत माहिती मिळवता येऊ शकते.
ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?
Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?