रूग्णाच्या शरीरातून काढली ७.४ किलोची किडनी, भारतातील पहिली सर्वात जास्त वजनी किडनी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 10:11 AM2019-11-27T10:11:00+5:302019-11-27T11:39:17+5:30

दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या एका टीमने एका रूग्णाच्या शरीरातून देशातील सर्वात वजनी किडनी काढली.

Biggest kidney operation in India and world | रूग्णाच्या शरीरातून काढली ७.४ किलोची किडनी, भारतातील पहिली सर्वात जास्त वजनी किडनी!

रूग्णाच्या शरीरातून काढली ७.४ किलोची किडनी, भारतातील पहिली सर्वात जास्त वजनी किडनी!

Next

(Image Credit : health.harvard.edu)

दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या एका टीमने एका रूग्णाच्या शरीरातून देशातील सर्वात वजनी किडनी काढली. या किडनीचं वजन तब्बल ७.४ किलो इतकं आहे. ही किडनी जगातली तिसरी सर्वात मोठी किडनी आहे. तब्बल दोन तासांच्या सर्जरीनंतर डॉ. सचिन शर्मा, डॉ. सचिन कथूरिया आणि डॉ. जुहील नानावटी यांनी ही किडनी काढली.

काय झालं होतं?

डॉ. सचिन कथूरिया यांनी सांगितले की, ५६ वर्षीय रूग्ण दिल्लीचा राहणारा आहे. तो ऑटोसोमल डोमिनन्ट पॉलिसिस्टीक किडनी डिजीज नावाच्या जेनेटिक डिसऑर्डरने पीडित होता. पॉलिसिस्टीक किडनी हा आजार एक आनुवांशिक आजार आहे. यात दोन्ही किडनींमध्ये द्रव्याने भरलेले सिस्ट विकसित होतात. ज्यात आतून सूज येते. या रूग्णावर २००६ पासून आमच्याकडे उपचार सुरू होते. पण यात असलेल्या धोक्यामुळे आधी सर्जरीसाठी ते तयार नव्हते.

याआधीही झाल्या अशा सर्जरी

आतापर्यंत जगभरात अशाप्रकारच्या दोन सर्जरी झाल्या आहेत. पहिली सर्जरी अमेरिकेत झाली. त्यावेळी एका रूग्णाच्या शरीरातून ९ किलोची किडनी काढण्यात आली होती. त्यानंतर नेदरलॅंडमध्ये एका रूग्णाच्या शरीरातून ८.७ किलो वजनाची किडनी काढली होती. 

किडनी खराब होण्याची काही कारणे

1. पेनकिलरचा जास्त वापर करणं 

(Image Credit : hopkinsmedicine.org)

सतत घेण्यात येणारी औषधं म्हणजेच, 'नॉनस्टेरॉइड अॅन्टी-इफ्लेमेटरी ड्रग्स' तुमचं दुखणं कमी करू शकतात. पण याचा किडनीवर परिणाम होत असतो. त्यामुळे औषधांचं सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

2. जास्त वेळ लघवी रोखून धरणं 

तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल कामाच्या ताणामुळे किंवा अन्य कारणांमुळे बराच वेळ लघवी रोखून ठेवतात. जर तुम्हीही असचं काही करत असाल तर वेळीच सावध व्हा. लोकमत न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एक्सपर्ट्सच्या मते, लघवी रोखून धरल्याने किडनीवर परिणाम होत असतो. असं केल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात आणि यामुळे यूटीआयसारखे आजार होण्याचा धोका संभवतो. 

3. प्रोसेस्ड फूड 

प्रोसेस्ड फूड सोडियम आणि फॉस्फरसचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत. अनेक लोकं ज्यांना आतड्याचे आजार असतात. त्यांनी आहारातील फॉस्फरस कमी करणं आवश्यक असतं. काही संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, फॉस्फरसयुक्त प्रोसेस्ड पदार्थांचं अधिक सेवन आतडी आणि हाडांसाठी अत्यंत घातक ठरतं. 

4. जास्त मिठाचं सेवन 

मीठामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि आतड्यांना नुकसान पोहोचचं. मीठाऐवजी आयुर्वेदिक पदार्थ आणि मसाल्यांचा वापर करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. वेळेसोबतच तुम्हाला अतिरिक्त मीठ खाणं टाळणं गरेजंचं आहे. 

5. पाणी कमी पिणं 

शरीर हायड्रेट असेल तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं सहज शक्य होतं. तसेच किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणं उत्तम उपाय आहे. तुम्हाला दररोज 1ते 2 लीटर पाणी पिणं गरजेचं असतं. 

6. झोप पूर्ण न होणं 

(Image Credit : ptsdupdate.com)

रात्री शांतपणे झोपणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 24 तासांची झोप घेणं आवश्यक असतं. 


Web Title: Biggest kidney operation in India and world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.