कोरोनाच्या लढाईत निष्काळजीपणा! नदी किनारी फेकला जातोय पीपीई किट्स, शवपेटीचा कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 06:11 PM2020-07-29T18:11:16+5:302020-07-29T18:23:48+5:30

कोरोना विषाणूचा झपाट्यानं प्रसार होण्यास लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Bihar health department negligence ppe kits and globs are being shed in the river in gaya | कोरोनाच्या लढाईत निष्काळजीपणा! नदी किनारी फेकला जातोय पीपीई किट्स, शवपेटीचा कचरा

कोरोनाच्या लढाईत निष्काळजीपणा! नदी किनारी फेकला जातोय पीपीई किट्स, शवपेटीचा कचरा

googlenewsNext

देशभरात कोरोना विषाणूने थैमान  घातलं आहे. कोरोनाच्या माहमारीला पळवून लावण्यासाठी ठिकठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात आहे.  तर दुसरीकडे मात्र निष्काळजीपणा दिसून येत आहे . त्यामुळे कोरोना विषाणूचा झपाट्यानं प्रसार होण्यास लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बिहारच्या फल्गु नदीकिनारी कोरोना रुग्णांच्या उपचारां दरम्यान वापरात असलेले ग्लोव्हज , पीपीई किट फेकले आहे. इतकंच नाही तर शवपेटीचा कचरा सुद्धा नदीच्या परिसरात फेकण्यात आला आहे. 

या फोटोत तुम्ही पाहू शकता अस्वच्छेचा कहर केला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या शवपेट्याही त्याच ठिकाणी उघड्यावर  फेकण्यात आल्या आहेत. त्यामुळे संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. वैद्यकिय सामानाचा कचरा अशा पद्धतीने फेकल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. फल्गु नदीच्या किनारी ज्या ठिकाणी हा वैद्यकिय कचरा फेकला त्याठिकाणी श्मशानभूमी आहे. अन्य मृतांचे अंत्यसंस्कारीही त्या ठिकाणी केले जातात. त्याठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी शवपेटी, ग्लोव्हज आणि पीपीई किटचा कचरा त्याच ठिकाणी फेकून निघून जातात.

ऐसे कोरोना से लड़ेगा बिहार! नदी किनारे फेंके जा रहे मरीजों के शव बॉक्स

रुग्णालय प्रशानसाने रुग्णाला शवपेटीसहित अंतिम संस्कार करण्याचे आदेश दिलेले असतानाही कर्मचारी वर्गाने असा निष्काळजीपणा केला आहे.  यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त वाढत आहे. जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी पालिका कर्मचारी आणि संबंधित व्यक्तिंशी याबाबात विचारपूस केली आहे. 
दरम्यान महाराष्ट्रातही अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे वापरलेले पीपीई किट आणि औषधे प्रवरा नदीपात्रात उघड्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात. त्याच ठिकाणी या वस्तू पडल्या असल्याने नागरिकही घाबरले आहेत. संगमनेर शहरात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात त्याच ठिकाणी वापरलेले अनेक पीपीई कीट आणि औषधे उघड्यावर फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

CoronaVirus News : अमेरिकन कंपनीची कोरोनाची लस खिशाला कात्री लावणार; जाणून घ्या किंमत

युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते

Web Title: Bihar health department negligence ppe kits and globs are being shed in the river in gaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.