कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:46 PM2021-02-19T15:46:31+5:302021-02-19T15:57:35+5:30
Bill gates says about climate change : ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी एकच मार्ग आहे. झाडं लावणं आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं उद्दीष्टापर्यंत पोहोचता येऊ शकतं.
कोरोनाच्या माहामारी पाठोपाठ भविष्यकाळातील संकंटाबाबत बिल गेट्स यांनी महत्वाची सुचना दिली आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी सांगितले की, ''वातावरणात बदल होण्याच्या समस्येचा उपाय शोधण्याच्या तुलनेत कोरोना माहामारीची समस्या दूर करणं सोपं आहे. वातावरणातील बदलांसाठी उपाय शोधणं हे मानवतेसाठी सगळ्यात चांगलं काम असेल.'' बिल गेट्स यांनी वातावरण बदलाच्या मुद्द्यावर एक पुस्तक लिहिले होते. ज्याचे नाव (How to Avoid a Climate Disaster) जल आणि वायू आपत्ती कशी टाळता येईल असे आहे.
ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी या पुस्तकाचा आधार घेतला जावा असं म्हणलं जात आहे. बीबीसीला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये गेट्स यांनी सांगितले की, ''वातावरणावरातील बदलांच्या समस्या कमी करून पाहा. पुढच्या ३० वर्षात आपण जे करायला जाणार आहोत. असा बदल याआधी कधीही झालेला नाही. ५१ अरब टन ग्रीनहाऊस गॅस वायूमंडळात वाढत आहेत. आपल्याला हा आकडा शुन्यांवर आणायचा आहे.''
दरम्यान वायू मंडळात ग्रीन हाऊस गॅस वाढल्यामुळे धरणी गार होत आहे. यामुळे बर्फ वितळण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर आपत्ती येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बिल गेट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी एकच मार्ग आहे. झाडं लावणं आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं उद्दीष्टापर्यंत पोहोचता येऊ शकतं. खुशखबर! रामदेव बाबांनी शोधला कोरोनाचा रामबाण उपाय; फक्त ३ दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा
बिल गेट्स यांनी सांगितले की, ''वायू उर्जा आणि सौर उर्जेच्या वापरानं इलेक्ट्रिसिटी डिकार्बनाईज केली जाऊ शकते. पण एकूण ग्रीन हाऊस गॅसच्या उत्सर्जनाचे योगदान ३० टक्के असते. याशिवाय स्टील, सीमेंट्स ट्रांसपोर्ट सिस्टीम, फर्टीलायजर्स निर्मिती डिकार्बनाईज केली जाणं गरजेचं आहे.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''असे खूप सेक्टर्स आहेत. ज्यांना सध्या डिकार्बनाईज करण्यासाठी आपल्याकडे कोणताही उपाय नाही. सरकारच्या पुढे जाऊन काम करायला हवं तसंच संशोधन आणि विकासावर पैसै खर्च करावे लागतील.'' काळजी वाढली! अमेरिकेत एकत्र झाले कोरोनाचे दोन स्ट्रेन; हायब्रिड कोरोना अधिक जीवघेणा ठरणार?