चिंताजनक! कोरोनानंतर आता आणखी २ संकटं येणार; बिल गेट्स यांचा जगाला सावध करणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 01:08 PM2021-02-08T13:08:55+5:302021-02-08T13:43:50+5:30

Bill gates warning News in Marathi : आता कोरोनापेक्षाही भयंकर अशा दोन संकटांचा भविष्यात सामना करावा लागणार आहे. असा इशारा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिला आहे.

Bill gates warned to more disasters after corona pandemic | चिंताजनक! कोरोनानंतर आता आणखी २ संकटं येणार; बिल गेट्स यांचा जगाला सावध करणारा VIDEO

चिंताजनक! कोरोनानंतर आता आणखी २ संकटं येणार; बिल गेट्स यांचा जगाला सावध करणारा VIDEO

googlenewsNext

कोरोनाच्या माहामारीनं गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. या कालावधीत कोरोनाची लस कधी येणार याचीच सगळ्यांना प्रतिक्षा होती. अखेर वर्षाच्या सुरूवातीला जगभरातील इतर देशांप्रमाणेच भारतातही लसीकरणाला सुरूवात झाली. कोरोनाच्या माहामारीने संपूर्ण जगभरातील लोकांच्या जीवनात बदल झालेला दिसून आला. आता कोरोनापेक्षाही भयंकर अशा दोन संकटांचा भविष्यात सामना करावा लागणार आहे. असा इशारा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिला आहे.

२०१५ मध्येही बिल गेट्स यांनी कोरोनाच्या माहामारीबाबत भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी आता खरी ठरलेली पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा जगाला दोन मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे.  'व्हेरीटाझियम' (Veritasium) युट्यूब चॅनेलवर बिल गेट्स यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

व्हेरीटाझियम' युट्यूब चॅनेलवर डेरेक म्युलर यांना मुलाखत देताना बील गेट्स यांनी सांगितले की, ''असे अनेक  रेस्पिरेटरी व्हायरस आहे आणि ते येतच राहणार. रेस्पिरेटरी डिसीज म्हणजेच श्वसनसंबंधी आजार खूप धोकादायक आहेत. त्यांच्यापासून सावधगिरी बाळगायला हवी.'' याव्यतिरिक्त जगासमोर आणखी दोन संकटं आहेत एक म्हणजे वातावरणातील बदल (climate change) आणि दुसरं बायो टेरोरिझम (Bio-terrorism)

वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी महामारीपेक्षाही जास्त लोकांचा बळी जातो. आणखी म्हणजे बायो टेरोरिझम Bio-terrorism. याचाच अर्थ व्हायरसचा हल्ला. यामुळे होणारं नुकसान हे  नैसर्गिक महासाथीपेक्षाही जास्त असू शकतं असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  बिल गेट्स यांनी सांगितले की, ''पुढच्या  काही दशकात युद्ध नव्हे तर असा व्हायरस १० दशलक्ष लोकांचा जीव घेऊ शकेल, मिसाईल नाही तर मायक्रोब्स कोट्यावधी लोकांचा जीव घेईल. कारण आपण अशा महामारीवर मात करण्यासाठी तयारी केलेली नाही." कोरोना लस सर्वांना मिळेपर्यंत...; बिल अन् मेलिंडा गेट्स यांनी सांगितला पुढचा धोका

याआधीच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होतं की, ''कोरोना व्हायरस हा अंतिम साथीचा रोग ठरू शकत नाही. ज्याप्रकारे आपण युद्धाची धमकी गांभीर्याने घेतो तसतसे आपण माहामारीसारख्या रोगाशी लढायला आणि गंभीरपणे विचार करण्यास तयार असले पाहिजे. संशोधन आणि विकासासाठी जगाला दुप्पट गुंतवणूक करण्याची गरज आहे.'चिंताजनक! पुढची महामारी असणार जैविक दहशतवादाचा परिणाम, जगाला तयार राहावं लागणार; बिल गेट्स

Web Title: Bill gates warned to more disasters after corona pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.