बिपाशा बासु आणि शिल्पा शेट्टीच्या पाठोपाठ आता सुनील शेट्टीही देणार फिटनेस मंत्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2017 12:34 PM2017-01-23T12:34:12+5:302017-01-23T18:04:12+5:30
वर्कआऊट व्हिडिओज ते डाएट प्लॅन, वजन वाढवणे/कमी करणे या सगळ्या गोष्टींच्या फिटनेस मंत्रा सांगण्यासाठी बिपाशा बासू आणि शिल्पा शेट्टी यांच्याप्रमाणे सुनील शेट्टीही सज्ज.
Next
य ग गुरू बाबा रामदेव यांच्या माध्यमातून सारेच फिटनेसला घेवून जागृत झाल्याचे पाहायला मिळतं. या धावपळीच्या जगात आपल्या शरीरालाही जपण्याची गरज आहे. त्यामुळेच फिटनेस विषयी लोकांमध्ये जागृता निर्माण व्हावी यासाठी अनेक सेलिब्रेटी मंडळी पुढे आले आहेत. त्यात बिपाशा बासू आणि शिल्पा शेट्टी यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.आरोग्य आणि स्वास्थ्य कार्यक्रमांसारखे कार्यक्रम कमी प्रमाणाता बघायला मिळतात.योगाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी आणि बिपाशा बासु सारख्या अभिनेत्रींना योगाच्या माध्यमातून फिटनेसमंत्रा दिला. आता त्यापोठोपाठ फिटनेसमंत्रा सांगण्यासाठी सुनील शेट्टीही सज्ज झाले आहेत.सुनील शेट्टीसोबत त्यांची फिटनेस टीम असेल. या टीममध्ये मिकी मेहता, नवाझ मोदी सिंघानिया, यासिम कराचीवाला, रमोना ब्रॅगँझा आणि सत्या यांचा समावेश आहे. यातून प्रेक्षकांची कार्यक्रमातील गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे त्यांच्या डाएट व व्यायामातील लक्ष्य गाठण्यासही मदत होईल.वर्कआऊट व्हिडिओज ते डाएट प्लॅन, वजन वाढवणे/कमी करणे यासाठीचे प्रेरणादायी कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमातून लिव्हफिट त्यांच्या प्रेक्षकांसाठी अनेकविध पर्याय उपलब्ध करून देणार आहे.
''आरोग्य आणि स्वास्थ्यासंदर्भात आज अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत. त्यामुळेच, चुकीची किंवा अयोग्य माहिती वापरून ती अंगिकारण्याची शक्यताही अधिक आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत योग्य व पडताळून पाहिलेले आरोग्य आणि स्वास्थ्य सल्ले पोहोचवण्याचे काम मी गेल्या काही वर्षांपासून करत आहे. देशभरात मोठ्या संख्येवर प्रेक्षक असणा-या आणि कानाकोपर्यायत पोहोचलेल्या सोनीलिव्हसारख्या व्यासपीठाशी जोडले जाण्याचा मला आनंद वाटत असल्याचे सुनील शेट्टीने म्हटले आहे.'' यावेळी सुनील शेट्टीला सपोर्ट करण्यासाठी सोहले खान आणि सुरज पांचोली यांनीही आवर्जुन उपस्थिती लावली होती.