पुन्हा बर्ड फ्लूने काढले डोके वर; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:35 PM2018-12-26T13:35:10+5:302018-12-26T13:39:04+5:30

भारतातील पटनामध्ये सध्या बर्ड फ्लूने थैमान घातलं असून येथील संजय गांधी जैविक उद्यान (प्राणीसंग्रहालय) बर्ड फ्लूमुळे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे.

Bird flu in india what is bird flu symptoms treatment and prevention | पुन्हा बर्ड फ्लूने काढले डोके वर; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!

पुन्हा बर्ड फ्लूने काढले डोके वर; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!

Next

(Image Creadit : Odisha Sun Times)

भारतातील पटनामध्ये सध्या बर्ड फ्लूने थैमान घातलं असून येथील संजय गांधी जैविक उद्यान (प्राणीसंग्रहालय) बर्ड फ्लूमुळे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे. येथील वन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील आठवड्यामध्ये प्राणीसंग्रहालयातील जवळपास सहा मोरांचा मृत्यू झाला आहे. मृत मोरांचं शव तपासणीसाठी मध्यप्रदेश भोपाळमधील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थानामध्ये पाठविण्यात आलं आहे. तपासणीमध्ये मृत मोरांमध्ये एच5एन1 वायरस आढळून आले आहेत. 

'बर्ड फ्लू' हा आजार एवियन इन्फ्लूएंजा वायरस H5N1 मुळे होतो. हा वायरस पक्षी आणि माणसांना आपलं शिकार बनवतो. बर्ड फ्लू इन्फेक्शन चिकन, टर्की, मोर आणि बदक यांसारख्या पक्ष्यांमुळे पसरतो. हा इन्फ्लूएंजा वायरस फार धोकादायक असून यामुळे पक्ष्यांसोबतच माणसांचाही मृत्यू होण्याचा धोका असतो. 

बर्ड फ्लूची लक्षणं :

बर्ड फ्लूची लक्षणं साधारण तापासारखीच असतात. परंतु, बर्ड फ्लू झालेल्या लोकांना श्वसनाच्या अनेक समस्यांसोबतच सतत उलट्या होण्याची समस्याही उद्भवते. या आजारांमध्ये इतर लक्षणं ही साधारण असतात. 

  • ताप 
  • छातीमध्ये कफ होणं
  • नाक वाहणं
  • डोकेदुखी
  • घशामध्ये सूज येणं
  • स्नायूंना वेदना होणं
  • सांधेदुखी
  • पोटाच्या समस्या
  • सतत उलट्या होणं
  • अस्वस्थ वाटणं
  • श्वसनासंदर्भातील विकार 
  • न्युमोनिया
  • डोळ्यांच्या समस्या

 

म्हणून माणूस होतो बर्ड फ्लूचा शिकार :

सामान्यतः माणसांमध्ये हा आजार कोबड्यांमुळे किंवा बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्ष्यांच्या सानिध्यात आल्यामुळे होतो. एखाद्या पक्ष्याला हा आजार झाला असेल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्या सानिध्यात आलात तर हा आजार तुम्हालाही होऊ शकतो. माणसांमध्ये बर्ड  फ्लू या गंभीर आजाराचा वायरस डोळे, नाक आणि तोडांमार्फत प्रवेश करतो. 

असा करा बचाव :

- बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांपासून दूर रहा.

- एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यापासून लांब रहा.

- बर्ड फ्लूची साथ आली असेल तर नॉन व्हेज खाणं टाळा.

- नॉन व्हेज खरेदी करताना स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. 

- बर्ड फ्लूची साथ असलेल्या ठिकाणी जाऊ नका किंवा मास्क लावून जा. 

बर्ड फ्लूवर उपचार :

बर्ड फ्लूवर उपचार म्हणून एंटीवायरल ड्रग ओसेल्टामिविर (टॅमीफ्लू)  (oseltamivir (Tamiflu) )आणि जानामिविर (रेलेएंजा) (zanamivir (Relenza)) परिणामकारक ठरतं. हा वायरस कमी करण्यासाठी लागण झालेल्या व्यक्तीने पूर्णपणे विश्रांची घेणं गरजेचं असतं. तसेच हेल्दी डाएट घेणं गरजेचं असतं ज्यामध्ये द्रव्यस्वरूपातील पदार्थांचा जास्त समावेश असेल. बर्ड फ्लूची लागण इतर लोकांना होऊ नये म्हणून बाधा झालेल्या रूग्णाच्या संर्कात येणं टाळा. 

Web Title: Bird flu in india what is bird flu symptoms treatment and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.