कोरोना व्हायरसनंतर आता भारतावर बर्ड फ्लू चं सावट; 'या' राज्यात शासनाचा सर्तकतेचा इशारा

By manali.bagul | Published: January 5, 2021 12:43 PM2021-01-05T12:43:55+5:302021-01-05T14:11:41+5:30

Health News in Marathi : हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील पौंग बांध अभयारण्यात गेल्या एका आठवड्यात 1800 प्रवासी पक्ष्यांना मृत्यूचा सामना करावा लागल्याचे समोर आलं आहे. 

Bird flu risk amid corona pandemic 1700 migratory birds death in himachal pradesh | कोरोना व्हायरसनंतर आता भारतावर बर्ड फ्लू चं सावट; 'या' राज्यात शासनाचा सर्तकतेचा इशारा

कोरोना व्हायरसनंतर आता भारतावर बर्ड फ्लू चं सावट; 'या' राज्यात शासनाचा सर्तकतेचा इशारा

Next

देशात कोरोना माहामारीच्या प्रसारात आता बर्ड फ्लू चा धोका वाढत आहे. राजस्थानच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात  252 कावळ्यांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे.  आता हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश आणि केरळमध्ये पक्ष्यांच्या रहस्यमय मृत्यूनं हाहाकार पसरवला आहे. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील पौंग बांध अभयारण्यात गेल्या एका आठवड्यात 1800 प्रवासी पक्ष्यांना मृत्यूचा सामना करावा लागल्याचे समोर आलं आहे. 

यामध्ये सोमवारी आढळलेल्या 505 मृत पक्ष्यांचा समावेश आहे. भोपाळ आणि बरेलीच्या नमुना अहवालात या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू (एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस) असल्याची पुष्टी झाली आहे. कांगडा जिल्हा प्रशासनाने डेहरा, जावली, इंदोरा आणि फतेहपूर उपविभागातील कोंबडी, अंडी, मासे यासह पोल्ट्री उत्पादनांच्या विक्रीस बंदी घातली आहे.

या व्यतिरिक्त पोंग धरण व त्याच्या आसपासच्या भागात कुक्कुटपालन व शेती करण्यासारख्या कामांनाही बंदी घातली जाईल. आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 5०,००० रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर केरळमधील कोट्टायम आणि अलाप्पुझामधील प्रकरणानंतर या भागातील एक किमीच्या परिसरात बदके, कोंबडीची व इतर पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणखी बरीच राज्येही सावध झाली आहेत.

केरळ- 12 हजार बदकांचा मृत्यू,  36 हजार मारले जाणार

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री के.आर. राजू म्हणाले की, ''दोन जिल्ह्यात बदकांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हजारो बदकं मारले जातील. सरकार शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देईल. आतापर्यंत 12 हजार बदके मेली आहेत, तर 36 हजारांचा बळी घेतला जाणार आहे. लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे.''

 अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

मध्यप्रदेश: इंदूरमध्ये  150 कावळ्यांच्या मृत्यूनं केला कहर

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मृत आढळलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणूची पुष्टी झाली आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे डॉ. अमित मालाकर म्हणाले की, ''आतापर्यंत 150 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांमधील संक्रमणाची पुष्टी झाल्यानंतर पोल्ट्री फॉर्मचीही चौकशी केली जात आहे. त्यांनी सांगितले की H5N8 विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. तथापि, माणसांमध्ये या आजाराची उपस्थिती अद्याप व्यक्त झालेली नाही.

दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR

असा करा बचाव

इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी फ्लूची लस डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेऊ शकता. या व्यतिरिक्त, आपण गर्दीच्या ठिकाणी बाजारात जाणे, संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळा, स्वच्छता राखून वेळोवेळी आपले हात धुवा. बहुतेक प्रकरणांमध्ये अँटीवायरल औषधांद्वारे त्यावर उपचार केले जातात. लक्षणं दर्शविल्यानंतर 48 तासांच्या आत औषधे घेणे आवश्यक आहे. बर्ड फ्लूची लागण झाल्याव्यतिरीक्त, त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर सदस्यांनाही या आजाराची लक्षणे नसतानाही औषधे घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

Web Title: Bird flu risk amid corona pandemic 1700 migratory birds death in himachal pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.