तुमच्या लिवरचे आरोग्य उत्तम राखते 'ही' कडू भाजी, मिळते सहज आणि भरपूर फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 03:51 PM2022-08-25T15:51:30+5:302022-08-25T15:53:57+5:30

कारल्यामध्ये कॅलरीज, फायबर, जीवनसत्त्वे, पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते, ज्याच्या मदतीने वजन कमी करता येते. इतकंच नाही तर मधुमेह, प्रतिकारशक्ती आणि त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून (Bitter Gourd Can Reduce Weight) घेऊया.

bitter gourd extremally beneficial for health specially for weight loss and liver health | तुमच्या लिवरचे आरोग्य उत्तम राखते 'ही' कडू भाजी, मिळते सहज आणि भरपूर फायदेशीर

तुमच्या लिवरचे आरोग्य उत्तम राखते 'ही' कडू भाजी, मिळते सहज आणि भरपूर फायदेशीर

Next

वजन कमी करण्यासाठी उत्तम आहारासोबत व्यायामाचीही गरज आहे. ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे, पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, कारल्याचा रस देखील वजन झपाट्याने कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो? कारल्याला कडू चव असते, त्यामुळे अनेकांना ती अजिबात आवडत नाही. मात्र, जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा कारलं आवडीने बनवलं जातं. वास्तविक, कारल्यामध्ये कॅलरीज, फायबर, जीवनसत्त्वे, पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते, ज्याच्या मदतीने वजन कमी करता येते. इतकंच नाही तर मधुमेह, प्रतिकारशक्ती आणि त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून (Bitter Gourd Can Reduce Weight) घेऊया.

जाणून घ्या कारल्याचे फायदे -
स्टाइलक्रेसच्या माहितीनुसार, कारल्याच्या रसाचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते कारण ते ग्लुकोज चयापचय तसेच लिपिड चयापचय सारखे कार्य करते. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी एक ग्लास कारल्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. कारल्याच्या रसाचे सेवन केल्याने हायपोग्लाइसेमिक प्रभाव वाढतो, ज्यामुळे ग्लुकोज चयापचय नियंत्रित होते. कारल्याचा रस यकृताच्या आरोग्यासाठी चांगला आहे. त्यातील हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म यकृताचे आरोग्य राखते.

कॅलरीज नियंत्रित करून डिटॉक्समध्ये उपयुक्त -
कारल्याचा रस कॅलरी कमी ठेवण्याबरोबरच कॅलरी आणि चरबी आणि कार्बोहायड्रेटची पातळी कमी ठेवतो. त्यामुळे पोटात साठलेली चरबी कमी होते आणि शरीर सक्रिय राहते. कारल्याच्या रसात व्हिटॅमिन सी जास्त असते. कारले शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. त्याच वेळी, ते विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे वजन वेगाने कमी होते.

कारल्याचा रस कसा घ्यावा -

  • कारल्याचा रस लिंबाच्या रसात मिसळून पिऊ शकता.
  • कारल्याच्या रसात भाजीचा रस मिसळता येतो.
  • भोपळ्याचा रस कारल्याच्या रसात मिसळून घेऊ शकता.

Web Title: bitter gourd extremally beneficial for health specially for weight loss and liver health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.