Weight loss tips: कॉफी प्यायल्याने वजन होते कमी! फक्त 'अशाप्रकारे' सेवन करा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 05:55 PM2022-04-10T17:55:54+5:302022-04-10T17:59:08+5:30
कॉफी पिऊन उत्साह वाढवण्यासोबतच वजनही कमी करू शकता. हे वाचून आश्चर्य वाटू शकतं. मात्र, कॉफी वजन कमी करण्यासाठी खरंच फायदेशीर ठरू शकते. साखर न घालता प्यायल्यावर त्याचा प्रभाव दुप्पट होतो.
काही लोकांना सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक कप कॉफी पिण्याची सवय असते. तुम्ही दुधासोबत कॉफी पित असाल तर त्याऐवजी ब्लॅक कॉफी प्या (Black Coffee Benefits). त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कॉफी पिऊन उत्साह वाढवण्यासोबतच वजनही कमी करू शकता. हे वाचून आश्चर्य वाटू शकतं. मात्र, कॉफी वजन कमी करण्यासाठी खरंच फायदेशीर ठरू शकते. साखर न घालता प्यायल्यावर त्याचा प्रभाव दुप्पट होतो.
ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिनपेक्षाही जास्त फायदेशीर गोष्टी (weight loss diet tips) आहेत आणि त्याची चवही छान लागते. फूड.एनडीटीव्हीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, दररोज ४ कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील चरबी सुमारे ४ टक्के कमी होते. जाणून घेऊया, ब्लॅक कॉफी पिऊन वजन कसं कमी (Black Coffee Benefits for Weight Loss) केलं जातं.
युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (USDA) नुसार, ग्राउंड बीन्सपासून बनवलेल्या ब्लॅक कॉफीच्या कपमध्ये दोन कॅलरीज असतात. तर ब्लॅक एस्प्रेसोमध्ये फक्त एक कॅलरी असते. आपण डिकॅफिनेटेड बीन्स वापरल्यास, कॉफीमधील कॅलरी शून्यापर्यंत कमी होते. अशा प्रकारे वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी पिऊ शकता.
ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड नावाचा पदार्थ असतो, तो वजन कमी करण्यास मदत करतो. क्लोरोजेनिक अॅसिड असल्यानं रात्रीच्या जेवणानंतर शरीरात ग्लुकोज तयार होण्यास विलंब होतो. याव्यतिरिक्त, नवीन चरबी पेशींची निर्मिती कमी होते, परिणामी शरीरात कमी कॅलरीज होतात. क्लोरोजेनिक ऍसिड अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते, ते उच्च रक्तदाब नियंत्रित करते, वजन कमी करते, साखरेची पातळी नियंत्रणात राखते.
कॉफीमध्ये असलेला कॅफिन हा घटक शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. कॅफिन हे एक नैसर्गिक उत्तेजक आहे, जे आपल्या मेंदू आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेला सक्रिय आणि एकाग्र राहण्यास मदत करतो. तसेच शरीरातील ऊर्जा पातळी सुधारण्यास मदत होते.
ब्लॅक कॉफी प्यायल्याने फॅट बर्न होते. ग्रीन कॉफी बीन्स शरीराची फॅट बर्न करण्याची क्षमता वाढवण्यास मदत करतात. यामुळे शरीरात जास्त चरबी जाळणारे एन्झाइम्स बाहेर पडतात. हे यकृतासाठी नैसर्गिक क्लीन्सर म्हणून काम करतात. यामुळे यकृत निरोगी राहते, खराब कोलेस्ट्रॉल आणि अतिरिक्त लिपिड कमी होते, ज्यामुळे चयापचय योग्यरित्या कार्य करू शकते.
शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यास ब्लॅक कॉफी फायदेशीर आहे. कोणत्याही साईड इफेक्टशिवाय वजन कमी करता येते. मात्र, तुम्हाला अगोदरपासून काही आजार असतील तर आहार घेण्यापूर्वी आहारतज्ज्ञ, पोषणतज्ञांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाच्या हेल्थसाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरेलच असे नाही.