'या' तीन गोष्टींमुळे प्यायला हवी ब्लॅक कॉफी, शरीरासाठी होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:51 PM2022-09-12T12:51:41+5:302022-09-12T12:54:18+5:30

दूध, साखर घालून केलेली कॉफी तुमचे वजन कमालीचे वाढवते. त्यामुळे अनेक आजार तसेच व्याधींनाही आमंत्रण मिळते. अशावेळी एक उत्तम पर्याय असतो तो म्हणजे ब्लॅक कॉफीचा. 

black coffee is extremally beneficial for weight loss | 'या' तीन गोष्टींमुळे प्यायला हवी ब्लॅक कॉफी, शरीरासाठी होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल

'या' तीन गोष्टींमुळे प्यायला हवी ब्लॅक कॉफी, शरीरासाठी होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल

googlenewsNext

कॉफी हा अनेकांच्या जगण्याचा प्राणवायू असतो. दिवसरात्र काम करणारे एम्प्लॉयी, अभ्यास करणारे विद्यार्थी आदी जणू कॉफीवरच जगत असतात. पण तुम्हाला माहित आहे का? दूध, साखर घालून केलेली कॉफी तुमचे वजन कमालीचे वाढवते. त्यामुळे अनेक आजार तसेच व्याधींनाही आमंत्रण मिळते. अशावेळी एक उत्तम पर्याय असतो तो म्हणजे ब्लॅक कॉफीचा. 

ग्रेटर नोएडाच्या जीआयएमएस हॉस्पिटलच्या डाएटिशियन डॉ. आयुषी यादव, यांनी झी न्युज हिंदीला सांगितले की बिनासाखरेची ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे शरीराला कोणते फायदे होतात?

लो कॅलरी ड्रिंक
युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रकल्चरच्या मते ग्राऊंड बीन्स पासून बनवलेल्या कॉफीमध्ये २ कॅलरी असते. तर एक्सप्रेसो कॉफीमध्ये १ कॅलरी असते. डिफॅनिकेडेट बीन्सचा वापर करुन बनवलेल्या कॉफीमध्ये झिरो कॅलरीज असतात.

वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर
ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजनिक अॅसिड नावाचा पदार्थ असतो. ज्यामुळे वजन कमालीचे कमी होते.यामुळे ग्लुकोजची शरीराच निर्मिती हळूहळू होते. तसेच त्यामुळे जास्त फॅट सेल्सही निर्माण होत नाहीत. ज्यामुळे वजन हळूहळू कमी होऊ लागते.

शरीरात भरपूर एनर्जी मिळते
कॉफीमध्ये कॅफिन असते त्यामुळे शरीरात उर्जा कायम राहते. कॅफिनमुळे मेंदु सक्रिय राहतो. ज्यामुळे आपण जास्त अॅक्टिव्ह राहतो.

Web Title: black coffee is extremally beneficial for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.