अलर्ट! रोज ब्लॅक कॉफी पित असाल तर सावधान; आरोग्यावर होतात 'हे' दुष्परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 05:30 PM2024-08-13T17:30:12+5:302024-08-13T17:30:33+5:30
ब्लॅक कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर घातक दुष्परिणाम होऊ शकतात. अशाच काही दुष्परिणामांबद्दल जाणून घेऊया....
काही लोकांना ब्लॅक कॉफी प्यायला इतकं आवडतं की ते दिवसातून अनेक वेळा त्याचं सेवन करतात. पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त ब्लॅक कॉफी प्यायलात तर त्याचा तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. ब्लॅक कॉफीचं सेवन मर्यादेतच करावं. ब्लॅक कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर घातक दुष्परिणाम होऊ शकतात. अशाच काही दुष्परिणामांबद्दल जाणून घेऊया....
पोटाशी संबंधित समस्या
ब्लॅक कॉफीमुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही ब्लॅक कॉफीचं सेवन मर्यादेपेक्षा जास्त केलंत तर तुम्हाला डायरियाचाही त्रास होऊ शकतो.
तणाव निर्माण होऊ शकतो
ब्लॅक कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन आढळल्याने तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही मर्यादेत कॉफी प्यायलात तर तुम्हाला आराम वाटेल, पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॉफी प्यायलीत तर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.
अस्वस्थ वाटू शकतं
एका दिवसात ५०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचं सेवन केल्याने अस्वस्थता आणि उलट्या होऊ शकतात. जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्यानेही डोकेदुखी होऊ शकते.
नेमकी किती कॉफी प्यावी?
जर तुम्ही एका दिवसात ५०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफीन घेत असाल, तर तुमची सवय ताबडतोब बदला. याशिवाय मानसिक आरोग्य, किडनी आणि थायरॉईडच्या रुग्णांनी ब्लॅक कॉफी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.