शरीरात वाढलेली चरबी कमी करायचीये? वापरा हा खास घरगुती उपाय, मग बघा कमाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:30 PM2022-11-03T12:30:11+5:302022-11-03T12:30:35+5:30

Black Cumin Water Benefits: याच्या सेवनाने पोटासंबंधी समस्या दूर होतात. सोबतच याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासही मदत मिळते. जिऱ्याचा एक प्रकार आहे ज्याला काळं जिरं म्हटलं जातं. हे जास्त फायदेशीर ठरतं.

Black cumin is the enemy of increasing fat gives dozens of benefits | शरीरात वाढलेली चरबी कमी करायचीये? वापरा हा खास घरगुती उपाय, मग बघा कमाल....

शरीरात वाढलेली चरबी कमी करायचीये? वापरा हा खास घरगुती उपाय, मग बघा कमाल....

googlenewsNext

Black Cumin Water Benefits:  जवळपास देशातील सगळ्याच किचनमध्ये जिऱ्याचा वापर होतो. याने पदार्थांची टेस्ट वाढते. पण अनेकांना हे माहीत नाही की, जिऱ्याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. जिऱ्याने इम्यूनिटी वाढते. हिवाळ्याच्या दिवसात तर इम्यूनिटी खूप कमी होते. अशात या दिवसात जिऱ्याचा वापर करणं फार फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने पोटासंबंधी समस्या दूर होतात. सोबतच याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासही मदत मिळते. जिऱ्याचा एक प्रकार आहे ज्याला काळं जिरं म्हटलं जातं. हे जास्त फायदेशीर ठरतं.

काळ्या जिऱ्याचे फायदे

1) खराब लाइफस्टाईल आणि चुकीचा आहार घेतल्याने आजकाल जास्तीत जास्त लोकांना पोटाची समस्या होते. ही समस्या दूर करण्यासाठी काळ्या जिऱ्याचं पाणी फार फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि पचन सुधारतं.

2) जेव्हा पनचात समस्या होते तेव्हा शरीरात अनावश्यक चरबी जमा होऊ लागते. चरबी जमा झाल्याने वजन वेगाने वाढतं. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, काळं जिरं फॅट कमी करून ते मलत्यागा दरम्यान बाहेर काढतं.

3) काळ्या जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते. याने तुमची इम्यूनिटी वाढते. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी राहतो. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी-खोकला नेहमी राहत असेल तर त्याने काळ्या जिऱ्याचं पाणी सेवन करावं. 
 

Web Title: Black cumin is the enemy of increasing fat gives dozens of benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.