Black Fungus: तुम्ही 'या' तीन गोष्टी करता? मग तुम्हाला 'ब्लॅक फंगस'चा अधिक धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 09:11 AM2021-05-24T09:11:37+5:302021-05-24T09:13:40+5:30
Black Fungus: तीन गोष्टींमुळे वाढतोय ब्लॅक फंगसचा धोका; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता ब्लॅक फंगसचा धोका वाढला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं काहीसा दिलासा मिळत असल्याचं चित्र बघायला मिळालं. मात्र आता ब्लॅक फंगसनं (म्युकरमायकोसिस) आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये काही समान धागे आहेत. त्यामुळे ब्लॅक फंगसचा धोका कशामुळे निर्माण होतो याची माहिती समोर आली आहे.
...तर मास्कमुळेच तुम्हाला ब्लॅक फंगसचा धोका; जाणून घ्या कसा कराल बचाव
एँटिबायोटिक्सचा वापर करणाऱ्या २१० जणांवर केलेल्या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली. अँटिबायोटिक्सचा वापर कलेल्या व्यक्तींना ब्लॅक फंगसची लागण झाली. याशिवाय स्टेरॉईड्सचा वापर करणाऱ्यांनादेखील ब्लॅक फंगसचा धोका असल्याची माहिती मध्य प्रदेशच्या महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे डॉ. व्ही. पी. पांडे यांनी दिली. डॉ. पांडे यांनीच २१० रुग्णांची माहिती घेऊन ब्लॅक फंगसबद्दल एक अहवाल तयार केला आहे. ब्लॅक फंगसची लागण झालेले १४ टक्के रुग्ण स्टेरॉईड्सचा वापर करत होते, अशी माहिती अहवालात आहे. आरोग्य मंत्रालयानंदेखील ब्लॅक फंगसची लागण होण्यास प्रामुख्यानं स्टेरॉईड्स जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
कोरोना नसलेल्या लोकांनाही ‘काळी बुरशी’चा आजार होऊ शकतो?; तज्ज्ञांनी सांगितलं कारण...
अँटिबायोटिक्स, स्टेरॉईड्स सोबतच ब्लॅक फंगसची लागण झालेल्यांमध्ये आणखी एक समान बाब आहे. गरम वाफ जास्त प्रमाणात घेणाऱ्यांना ब्लॅक फंगसचा अधिक धोका आहे. ब्लॅक फंगसची शिकार झालेल्या अनेकांनी जास्त प्रमाणात वाफा घेतल्या होत्या. आयएमएच्या कोच्ची चॅप्टरचे माजी प्रमुख डॉ. राजीव जयवर्धन यांनी याबद्दल धोक्याचा इशारा दिला. आपल्या शरीरावर एक थर असतो. शरीराला सूक्ष्मजंतूंपासून वाचवण्याचं काम हा थर करतो. अधिक प्रमाणात वाफा घेतल्यामुळे या थराला हानी पोहोचते आणि ब्लॅक फंगसचा धोका वाढतो, असं जयवर्धन यांनी सांगितलं.