health tips: हार्ट पेशंटसाठी 'ही' डाळ आहे रामबाण, फायदे इतके की रोज बनवून खाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 11:46 AM2022-03-02T11:46:50+5:302022-03-02T11:50:01+5:30

उडीद डाळीमध्ये पौष्टिक मूल्य (Nutritional Value) खूप जास्त आहे. त्यात आहारातील फायबर भरपूर असतं. त्याचबरोबर लोह (Iron), प्रथिनं (Protein), पोटॅशियम (Potassium), मॅग्नेशियम (Magnesium) आणि व्हिटॅमिन बी (Vitamin B) देखील मोठ्या प्रमाणात असतं.

black lentils or urad dal is extremely beneficial for heart disease | health tips: हार्ट पेशंटसाठी 'ही' डाळ आहे रामबाण, फायदे इतके की रोज बनवून खाल

health tips: हार्ट पेशंटसाठी 'ही' डाळ आहे रामबाण, फायदे इतके की रोज बनवून खाल

googlenewsNext

उडदाच्या डाळीची (Urad Dal) चव अनेकांना आवडत नाही. परंतु, उडीद डाळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या डाळीचा आपण आहारात नक्की समावेश करायला हवा. जाणून घेऊ या डाळीचं महत्त्व. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, उडीद डाळीमध्ये पौष्टिक मूल्य (Nutritional Value) खूप जास्त आहे. त्यात आहारातील फायबर भरपूर असतं. त्याचबरोबर लोह (Iron), प्रथिनं (Protein), पोटॅशियम (Potassium), मॅग्नेशियम (Magnesium) आणि व्हिटॅमिन बी (Vitamin B) देखील मोठ्या प्रमाणात असतं.

ही डाळ हाडांच्या मजबुतीसाठी चांगली
काळी टरफल असेली उडीद डाळ हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. उडदाच्या डाळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस ही पोषक तत्त्वं असतात. यामुळं हाडं मजबूत होतात. ही डाळ खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो.

हृदय निरोगी ठेवते
उडदाच्या डाळीमध्ये पोटॅशियम असतं, जे रक्तवाहिन्या आणि धमन्यांमधील ताण कमी करतं आणि हृदय निरोगी ठेवतं.

वेदना आणि सूजेपासून आराम
उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे वेदना आणि सूज कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. याच्यामुळं स्नायू आणि सांधेदुखी कमी होते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी
आहारातील फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं उडदाची डाळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उडदाची डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

पचनामध्ये गुणकारी
तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तरीही उडदाची डाळ तुम्हाला फायदेशीर ठरेल. यामध्ये विरघळणारं फायबर असतं, जे पोषक तत्त्वं शोषून घेण्यास मदत करतं आणि न विरघळणारं फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर ठेवतं.

Web Title: black lentils or urad dal is extremely beneficial for heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.