काळे की पांढरे? हिवाळ्यात कोणते तीळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 12:35 PM2023-11-13T12:35:34+5:302023-11-13T12:38:10+5:30
हिवाळ्यात पांढऱ्या तीळाच्या तुलनेत जास्त फायदेशीर ठरतात. काळ्या तीळाची साल पांढऱ्या तिळाच्या तुलनेत अधिक जास्त कायम राहते.
Black vs white sesame seeds which is better : हिवाळ्यात तीळ खाणं फार फायदेशीर मानलं जातं. पण लोक बऱ्याचदा काळे की पांढे तीळ खावेत याबाबत कन्फ्यूज असतात. तसे तर दोन्हींमध्ये पोषक तत्व भरपूर असतात आणि यांच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण जास्त फायद्यांसाठी कोणते तीळ जास्त खावेत हे जाणून घेऊया.
सकुरा डॉट को नुसार, हिवाळ्यात पांढऱ्या तिळाच्या तुलनेत जास्त फायदेशीर ठरतात. काळ्या तिळाची साल पांढऱ्या तिळाच्या तुलनेत अधिक जास्त कायम राहते. ज्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हिवाळ्यात पांढऱ्या तिळापेक्षा जास्त काळ्या तिळाचे लाडू, चिक्की खावी. तेव्हाच हाडे अधिक मजबूत होतील.
काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळाच्या तुलनेत अधिक पोषक तत्व असतात. जे आरोग्याला अधिक फायदे देतात. याचं कारण म्हणजे काळ्या तिळाची साल जास्त ठोस आणि कायम राहते, ज्यात काही फायदेशीर सूक्ष्म पोषक तत्व असतात.
काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळाच्या तुलनेत जास्त ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं. जे हृदयासोबतच इतर अवयव हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. सोबतच यात फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, अॅंटी-ऑक्सीडेंट्सही भरपूर असतात. या काळ्या बीया अनेक क्रॉनिक डिजीजपासून बचाव करतात.
हिवाळ्यात इन्फेक्शन आणि इतर आजारांपासून बचाव करायचा असेल तर काळ्या तिळाचं अधिक सेवन करा. याने इम्यून सिस्टीम बूस्ट होते. ज्यामुळे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो.
काळ्या तिळाचा आणखी एक फायदा म्हणजे याने मेटाबॉल्जिम रेग्युलेट होतं. सोबतच यात मॅग्नेशिअम असल्याने ब्लड प्रेशरमध्येही सुधारणा होते. जर तुमचा रक्तदाब हाय असेल तर तुम्ही काळ्या तिळाचे पदार्थ सेवन केले पाहिजे.
काळे तीळ खाल्ल्याने फ्री रॅडिकल डॅमेजमुळे लिव्हरचा बचाव होतो. मेमरी लॉस होत नाही. मेंदुची कार्यक्षमता वाढते. सोबतच यात अॅंटी-कॅन्सर तत्वही असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या कॅन्सरचा धोका टळतो.