लिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर ठरतात जांभळं, जाणून घ्या कसं कराल सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 03:06 PM2024-07-04T15:06:22+5:302024-07-04T15:10:22+5:30

Black Plum Benefits : पावसाळ्यात लोक जांभळं फार आवडीने खातात. या फळाची टेस्टही आंबट-गोड असते. जांभळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Black plum is beneficial in piles stones and kidney diseases, know benefits | लिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर ठरतात जांभळं, जाणून घ्या कसं कराल सेवन!

लिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर ठरतात जांभळं, जाणून घ्या कसं कराल सेवन!

Black Plum Benefits : निसर्गाने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं दिली आहेत. महत्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळी फळं मिळतात. खायला काही गोड, काही आबंट तर काही खारट-तुरट असतात. पावसाळ्यात लोक जांभळं फार आवडीने खातात. या फळाची टेस्टही आंबट-गोड असते. जांभळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

महत्वाची बाब म्हणजे आयुर्वेदात जांभळाच्या बियांचा, सालीचा आणि पानांचाही औषधी म्हणून वापर केला जातो. जांभळामध्ये आयर्न, कॅल्शिअम, प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेटसारखे भरपूर पोषक तत्व असतात. अनेक आजार दूर करण्यासाठी हे फळं फायदेशीर मानलं जातं. 

लिव्हरच्या समस्या होतील दूर

लिव्हरवर सूज असेल तर जांभळाच्या बियाचं रस सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जांभळाच्या व्हिनेगरचं रोज सेवन केल्याने लिव्हरच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतात.

किडनी स्टोन होईल दूर

किडनी स्टोन झाल्यावर जांभळाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जांभळांचं सेवन केल्याने किडनी स्टोन गळून बाहेर पडतात.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

डायबिटीस असल्यावर जांभळांचं सेवन केल्याने लगेच आराम मिळते. जांभळाची मूळ स्वच्छ करून पाणी टाकून बारीक करा. सकाळी जेवणाआधी याचं सेवन केल्याने डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळते.

असंही करू शकता जांभळाचं सेवन

जांभळं तुम्ही तशीही खाऊ शकता. पण याचा अधिक फायदा मिळवण्यासाठी रोज 10 ते 20 एमएल जांभळाचा रस प्यावा. त्याशिवाय 3 ते 5 ग्रॅम चूर्णामध्ये जांभळाचं रस टाकून सेवन करा. जांभळाचा काढा बनवून प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात.

जांभळं खाल्ल्यावर काय खाऊ नये?

- जांभळं खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे तुम्हाला जुलाब किंवा उलटीची समस्या होऊ शकते. 

- हळद जांभळांसोबत कधीच खाऊ नये. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांवर रिअॅक्ट करतात. ज्यामुळे पोटदुखी, मळमळ आणि अॅलर्जी होण्याचा धोका राहतो.

- जांभळं कधीही दूध किंवा दुधापासून तयार पदार्थांसोबत खाऊ नये. कारण असं केल्याने पोटात गडबड होऊ शकते. असं केल्याने तुम्हाला अपचन, गॅस, पोटदुखीची समस्या होऊ शकते. 

- अनेक एक्सपर्ट जांभळं खाण्याआधी किंवा नंतर तुम्ही लोणचं खाल्लं तर तुम्हाला उलटी, गॅस आणि मळमळ होण्याची समस्या होऊ शकते.
 

Web Title: Black plum is beneficial in piles stones and kidney diseases, know benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.