काळे तीळ इतके फायदेशीर की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:03 PM2021-06-15T17:03:58+5:302021-06-15T17:08:06+5:30

आपण पांढऱ्या तिळाच्या फायद्याविषयी ऐकलं असेल पण तुम्हाला माहित आहे का की काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळ्या तिळाचा आहारात समावेश केल्याने कोण-कोणते फायदे होतात. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Black sesame is so beneficial that you can't even imagine ... | काळे तीळ इतके फायदेशीर की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही...

काळे तीळ इतके फायदेशीर की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही...

googlenewsNext

आपण पांढऱ्या तिळाच्या फायद्याविषयी ऐकलं असेल पण तुम्हाला माहित आहे का की काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात.जे आपले आरोग्या निरोगी ठेवण्यासाठी फार महत्वाचे आहेत. काळ्या तिळाचा आहारात समावेश केल्याने कोण-कोणते फायदे होतात. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
वजन कमी करण्यास उपयुक्त : काळे तीळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी आपल्याला काळ्या तिळात लिंबू मिक्स करून उन्हात ठेवा. त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे तीळ खा. यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
स्मरणशक्ती वाढते: सकाळी रिकाम्या पोटी आपण काळे तीळ आणि मध मिक्स करून त्याचे सेवन करावे. त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. मात्र, तीळ आणि मध एकत्र खाल्ल्यावर एक तास दुसरे काहीही खाणे टाळा.
हृदयाचे आरोग्य चांगले राखतात : काळे तीळ हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. जर दररोज सुमारे १० ते १२ काळे तीळ गाईच्या किंवा बकरीच्या दुधासह घेतल्यास हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो आणि बीपी नियंत्रित राहतो
चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात : दोन ते तीन ग्रॅम काळे तीळ दररोज खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. याशिवाय दमा आणि खोकल्याच्या समस्या कमी करण्यासाठी काळे तीळ फायदेशीर ठरतात.
केसांसाठी वरदान: काळ्या तिळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही, ते काळ्या तिळाचा वापर करू शकतात. या तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा-3चे पोषक घटक असतात.
दृष्टी सुधारते : काळ्या तिळाचे नियमितपणे सेवन केल्याने आपली दृष्टी चांगली होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त ज्यांना डोळ्यांची समस्या किंवा वारंवार डोळे लाल होण्याची समस्या असते त्यांनाही आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केला पाहिजेत.

Web Title: Black sesame is so beneficial that you can't even imagine ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.